वणीत साई हॉस्पिटलमध्ये 24×7 अतिदक्षता विभाग सुरू

विवेक पिदूरकर: वणीतील सुपरिचित हॉस्पिटल लोढा हॉस्पिटल येथे साई हॉस्पिटल अतिदक्षता विभाग सुरू झाला आहे. या अतिदक्षता विभागात 24 तास रुग्णांना इमरजन्सी सेवा दिली जाणार आहे. यासाठी मुंबई येथील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. सूरज…

गोंडबुरांडा येथे कीटकनाशक पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आज सकाळी 11 ते 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दिनकर पुंडलिक बोन्दरे (55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.…

तरुणाचा फडशा पाडणा-या वाघाला हुसकावण्यात यश

सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या अविनाश पवन लनगुरे (17) या तरुणाचा वाघाने फडशा पाडला. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. वाघ शिकारीजवळच असून शिकार खात आहे कळताच हा थरार बघण्यासाठी…

थरार: पिवरडोल शेतशिवारात वाघाने पाडला तरुणाचा फडशा

सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या एका तरुणावर वाघाने हल्ला करून त्याचा फडशा पाडला. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अविनाश पवन लेनगुरे (17) असे मृतकाचे नाव आहे. वृत्त लिहे पर्यंत (स. 8 वा.)…

पैसे चोरीचा आळ लावल्याने दिराची वहिणी व पुतणीला मारहाण

विवेक तोटेवार, वणी: चोरीचा आळ लावल्याने दिरानेच वहिणीला व पुतणीला मारहाण केल्याची घटना वणीतील खरबडा येथे घडली. गुरुवारी दुपारी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. यात पुतणी जखमी झाली आहे. या प्रकरणी दिर व भावजयीवर गुन्हा दाखल करण्यात आला…

समस्या: पळसोनी स्मशानभूमीचा प्रश्न अधांतरीच

जितेंद्र कोठारी, वणी: पळसोनी या गावात स्मशानभूमीला शेड नसल्याचे नागरिकांना उघड्यावरच मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसामध्ये अंत्यसंस्कार करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी ही समस्या त्वरित…

समस्या: मेंढोली ते वरझडी रस्त्याची दुरवस्था

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली ते वरझडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणा-या दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याबाबत 8 महिन्याआधी सार्वजनिक बांधकाम…

भरधाव कारच्या धडकेत गायीला मृ्त्यू, जन्नत हॉटेलसमोरील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: एका भरधाव वेगात असलेल्या कारने गायीला जबर धडक दिली. यात गायीचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दिनांक 8 जुलै रोजी संध्याकाळी पावने 7 वाजताच्या सुमारास जन्नत होटल समोर ही घटना घडली. दरम्यान धडक देऊन पळून जाताना या कारची…

विविध मागण्यांसाठी कोतवाल संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या अनेक वर्षांपासून चतुर्थ श्रेणी कोतवाल कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या समस्या तातडीने सोडविण्यात याव्या आणि कोतवालांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या मारेगाव तालुका…

झरी तालुका भाजपतर्फे राज्यसरकारचा निषेध

सुशील ओझा, झरी: राज्यसरकारने विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात भाजपच्या 12 सभासदांचे एक वर्षासाठी निलंबन केले. याचा झरी तालुका भाजपतर्फे निषेध करण्यात आला. हा प्रकार लोकशाहीची गळचेपी असून तहसीलदार मारेगाव यांच्यामार्फेत राज्यपाल यांना निवेदन…