कारची म्हशींना जोरदार धडक, तीन म्हैस जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: शहरातील बायपास रोडवर असलेल्या संविधान चौकात एका भरधाव कारने म्हशीच्या कळपाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात 3 म्हशी जागीच ठार झाल्या तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. शनिवार 10 जुलै रोजी रात्री 8.45 वाजताच्या सुमारास…

रात्री 11 वाजता अविनाश लेनगुरेवर अंत्यसंस्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पिवरडोल येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या 17 वर्षीय अविनाश पवन लेनगुरे याच्यावर रात्री 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाशच्या मृत्यूमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकरी व लेनगुरे…

शेतातील बांध फुटून पिंपरी-बाबापूर शेतशिवारात पिकांचे मोठे नुकसान

तालुका प्रतिनिधी: कायर परिसरातील पिंपरी, बाबापूर, बोरगाव शिवारात शनिवारी रात्री धुंवाधार पाऊस पडला. अवघ्या दीड ते दोन पडलेला पाऊस हा ढगफुटी सदृष्य असल्याचे बोलले जात आहे. या पावसामुळे शेतं खरडून निघाले आहे. तर शेतातील बांध फुटल्याने पिकांची…

वणी बहुगुणी इम्पॅक्ट: मेंढोली-वरझडी मार्गाच्या दुरवस्थेची दखल

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली-वरझडी या चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याची बातमी 'वणी बहुगुणी'वर प्रकाशित झाली होती. त्याची प्रशासनाने दखल घेत शनिवारी मेंढोली रस्त्यावरील जीवघेणा खड्डा बुजवण्यास ठेकेदारास पाठविले. मात्र गावक-यांनी…

निर्गुडा नदी दुथडी भरून वाहू लागली, नदीप्रेमींचे पावले नदीकडे

तालुका प्रतिनिधी, वणी: मोठी विश्रांती घेऊन पुन्हा पावसाने वणी उपविभागात दमदार बॅटींग केली. त्यामुळे माना टाकलेल्या पिके पुन्हा प्रफुल्लीत झाले आहे. गेल्या पंधरवड्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पिके कोमेजून जाऊ लागली होती. मात्र नुकत्याच…

मुकुटबन आरोग्य केंद्राला मुनगंटीवार यांच्यातर्फे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्यापही ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे गंभीर रुग्णांना वणी चंद्रपूर व यवतमाळ सारख्या ठिकाणी धावपळ करावी लागत होती. अखेर माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी…

वीजचोरी करणे पडले महागात, ठोठावला 27 हजारांचा दंड

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सिंधीवाढोना या गावात येथे वीज कट झाल्यानंतर परस्पर विजेची परस्पर जोडणी करून वीज चोरी करणे एका ग्राहकास चांगलचे महागात पडले आहे. शनिवारी वीज वितरण कंपनीद्वाराच्या त्याच्या घराची तपासणी केली असता हा प्रकार…

पिवरडोल वाघाच्या हल्ल्या प्रकरणी लिखीत आश्वासनानंतर मृतदेह उचलला

सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल वाघाचा हल्ला प्रकरणी ठोस आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी कठोर भूमिका ग्रामस्थांनी उचलल्यानंतर अखेर प्रशासनातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना लिखित आश्वासन देण्यात आले. यात शासकीय नियमानुसार…

शिबला परिसरात आढळलेल्या जिवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे

जितेंद्र कोठारी, वणी: नुकतेच झरी तालुक्यातील शिबला जवळ दुर्मिळ कोलमणार बेसाल्ट आढळले. ह्याच परिसरात शंख-शिंपल्याची आणि वनस्पतीची जीवाष्मेही आढळली आहेत. त्यामुळे ह्या स्थळाचे भौगोलिक महत्व वाढले असून हे स्थळ अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय…

सरपंच संघाच्या अध्यक्षपदी अजय कवरासे तर सचिवपदी हेमंत गौरकर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य ग्रामसंवाद सरपंच संघाची वणी तालुका कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. स्थानिक विश्राम गृहात जिल्हाध्यक्ष विठ्ठल आडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत ठाकोरी ग्रा.पं.चे सरपंच अजय कवरासे तर…