लो.टी. महाविद्यालय परिसरात पोलीस चौकी स्थापन करा

जितेंद्र कोठारी, वणी: येथील वरोरा रोडवरील लोकमान्य टिळक महाविद्यालय परिसरात पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या बाबत उपविभागीय अधिकारी वणी यांना बुधवार 14 जुलै रोजी निवेदन…

मोहदा येथे तुटलेल्या वीज केबलचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मोहदा येथील गिट्टी खदान क्षेत्रात वीज केबलचा स्पर्श होऊन बैलबंडीला जुंपलेला बैल मरण पावला. या घटनेत शेतकरी रवींद्र राजूरकर या शेतक-याचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात…

स्व. गुलाबराव खुसपुरे स्मृती प्रित्यर्थ 100 वृक्षांची लागवड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नगर सेवा समितीचे मार्गदर्शक व जैताई देवस्थान अन्नछत्र समितीचे अध्यक्ष स्व. गुलाबराव खुसपुरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 100 वृक्षांची लागवड करून आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगर सेवा समिती, स्माईल…

वंचित बहुजन आघाडीतर्फे 16 जुलै रोजी परिचय सभेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: वंचित बहुजन आघाडी वणी तालुका कार्यकारणीची प्रथम परिचय सभा दि 16 जुलै रोजी शासकीय विश्राम गृह वणी येथे आयोजित करण्यात आली आहे. बहुजन आघाडीचे वणी तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन होणार आहे.…

स्नेहनगरीत झुकलेला खांब देतोय दुर्घटनेला आमंत्रण

विवेक तोटेवार, वणी: शहरातील स्नेहनगरी येथील विद्युत खांब जवळपास दोन महिन्यांपासून झुकलेला आहे. याबाबत कॉलनीतील लोकांनी तक्रार दिली. परंतु महावितरण कर्मचारी ही समस्या सोडवण्यास टाळाटाळ करीत आहेत. विद्युत खांब पडल्यास मोठी हानी होण्याची…

आई वडिलांच्या मृत्यूनंतर पोरका झालेल्या पिंटूला मिळाली आर्थिक मदत

विवेक तोटेवार, वणी: गावाहून परत येत असताना अंगावर वीज कोसळून आईवडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात असलेला मुलगा पोरका व निराधार झाला. ही घटना वणीतील समाज सेवक सूरज गज्जलवार यांना माहिती पडताच त्यांनी यासाठी प्रयत्न केले व प्रकरणाचा…

येनक खून प्रकरणाचे गुढ उलगडले, अवघ्या दोन तासांमध्ये प्रकरणाचा छडा

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिंदोल्या जवळील येनकच्या जंगलात शिवणी (जहांगीर) येथील एका इसमाचा मृतदेह आढळला होता. दि.13 रोज मंगळवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सदर इसमाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती.…

सावधान…. पैनगंगा नदी काठावरील 14 गावांना सतर्कतेचा इशारा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील 14 गावांना महसूल विभागातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळा सुरू होताच पावसामुळे नदी नाले तदुंब भरून वाहतात. तालुक्यातील पैनगंगा नदी काठावर अनेक गावे असून त्या गावांना नदीच्या…

घरी पाहुणा म्हणून आला… मुलीला गर्भवती करून गेला… !

भास्कर राऊत, मारेगाव: प्रेयसी प्रियकराच्या नात्यातीलच होती. एकदा तो तिच्या घरी पाहुणा म्हणून गेला. त्यांचे सुत जुळले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान प्रेयसी गर्भवती राहिली. प्रेयसीने याबाबत प्रियकराला माहिती देताच प्रियकराने हात…

येनकच्या रस्त्यावर शिवणीच्या इसमाचा आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिंदोला माईन्स ते येनक रस्त्यावर शिवणी (जहागीर) येथील एका इसमाचा मृतदेह आढळला. आज दि.13 रोज मंगळवारला सकाळी ही घटना उघडकीस आली. शेषराव गजानन पिंपळशेंडे (50) असे मृतकाचे नाव आहे असून ते खासगी इलेक्ट्रिशियन…