पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मनसे सरसावली, शुक्रवारी होणार मदतीचा ट्रक रवाना

जितेंद्र कोठारी, वणी: कोकण किनारपट्टीवर उसळलेल्या जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. यानंतर विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरु आहे. अशा संकटकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मदतीचा हात पुढे केला आहे. अडचणीच्या या परिस्थितीत मनसे…

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा सर्पदंशाने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (खु.) येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. दत्ता विश्वनाथ थेरे (50) असे मृत शेतक-याचे नाव आहे. दहा दिवसांआधी त्यांना शेतात काम करीत असताना सर्पदंश झाला होता. त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात…

खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आंदोलकांचा आरोप

सुशील ओझा, झरी: काही दिवसांआधी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्त असलेल्या 70 ते 80 युवकांनी परिसरातील कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी आंदोलन केले होते. दरम्यान मुकुटबनच्या ठाणेदारांनी आंदोलकाचे नातेवाईक…

स्पेनमधील रांगोळी महोत्सवासाठी वणीच्या अश्विनी वऱ्हाडे हिची निवड

जब्बार चीनी, वणी: युरोप खंडातील स्पेनमधील सांतियागो या शहरामध्ये दर 5, 6 आणि 11 वर्षाच्या अंतराने जेकेबिन वर्ष म्हणून एक पवित्र सोहळा साजरा केला जातो. त्यामध्ये वणीच्या अश्विनी दीपक वऱ्हाडे हिने आकर्षक रांगोळी रेखाटून या आंतरराष्ट्रीय…

अल्पवयीन मुलीचे वेळोवेळी बळजबरी शोषण, मुलगी गर्भवती

सुशील ओझा, झरी: एका तरुणाने शाळेत शिकणा-या एका अल्पवयीन मुलीचे जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी बळजबरीने शारीरिक शोषण केले. आरोपी दोन वर्षांपासून जिवे मारण्याची धमकी देत पीडितेचे शोषण करत होता. दरम्यान पीडित मुलगी 6 महिन्याची गर्भवती…

तणनाशक पिऊन हटवांजरी येथील शेतक-याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: हटवांजरी येथील शेतकऱ्याने तणनाशक पिऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. देवराव लटारी फरताडे (40) असे मृत शेतक-याचे नाव आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. रात्री…

तेजापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची नासधूस

जितेंद्र कोठारी, वणी: महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण करुन शेती करणाऱ्या तेजापूर येथील शेतक-यांच्या शेतातील पिकांची नासधूस करण्यात आली. सोमवारी दिनांक 26 जुलै रोजी ही घटना घडली. आमलोन येथील शेतक-यांनी शेतातील पिके उद्ध्वस्थ केल्याचा पीडित…

वणीत मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज 27 जुलै मंगळवारला वणी येथे भव्य मॅराथॉन दौड स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले…

सेवानिवृत्त पोलिसाच्या दुचाकीच्या डिक्कीतून 45 हजार रुपये लंपास

विवेक तोटेवार, वणी: सेवानिवृत्त पोलीस कर्मचा-याच्या दुचाकीच्या डिक्कीतून 45 हजार रुपये चोरट्यांनी  लंपास केले. आज सोमवारी दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.…