ग्रामपंचायतकडे बोनस येऊनही रकमेचे वाटप नाही

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या पाच वर्षांपासून तेंदूपत्ता बोनसचे पैसे ग्रामपंचायतकडे जमा झालेले आहे. मात्र वारंवार मागणी करूनही या बोनसचे वाटप होत नसल्याने बोटोणी येथील 4 तेंदूपत्ता मजुरांनी आज मंगळवारी दिनांक 21 सप्टेंबर पासून मारेगाव पंचायत…

निर्गुडा नदीच्या पुलावरून एका इसमाने घेतली उडी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोक्षधाम जवळील पुलावरून एका इसमाने उडी मारली. फय्याज अली अजगर अली रा. मैल खड्डा (रंगनाथ नगर) असे उडी घेणा-या तरुणाचे नाव आहे. आज संध्याकाळी त्याचे कपडे आणि चप्पल निर्गुडा नदीच्या पुलावर आढळून आले. सध्या फय्याजचा…

राज जयस्वालची न्यायालयीन कोठडीत रवानगी

जितेंद्र कोठारी, वणी: महावितरण अभियंत्यासोबत वाद करुन हात मुरगळल्या प्रकरणी येथील व्यावसायिक राज जयस्वाल यांची आज न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. वीज अभियंता राजेश जिझिलवार यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल…

वणीत पहाटेपासून पावसाचा कहर, शहरातील रस्ते पाण्याखाली

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात आज पहाटेपासून शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. स. 11 वाजेपर्यंत हा मुसळधार पाऊस सुरूच होता. वृत्त लिहे पर्यंतही पावसाच्या सरी सुरूच होत्या. अचानक आलेल्या धुवाधार पावसामुळे संपूर्ण वणीतील रस्ते…

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मस्की यांना पितृशोक

भास्कर राऊत, मारेगाव: जिल्हा परिषदेच्या पहापळ येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मस्की यांचे वडील उद्धव देवाजी मस्की यांचे वृद्धापकाळाने आज मंगळवारी दि. 21 सप्टेंबरला निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. मारेगाव येथील…

ना ढोल-ताशा, ना मिरवणूक… तरीही गणरायाला उत्साहात निरोप

जितेंद्र कोठारी, वणी: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला... एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला या जयघोषात लाडक्या बाप्पाला वणीत निरोप देण्यात आला. शहरातील तब्बल 2 हजार घरगुती गणपतीची प्रतिमाचे…

वीज अभियंतासोबत हुज्जत, टायर व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून शहरातील सुपरिचित व्यावसायिक राज जयस्वाल यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन अधिका-यांशी हुज्जत घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या…

वणीतून दुचाकी चोरून नेणा-याला अटक

विवेक तोटेवार, वणी: ऑगस्ट महिन्यात वणी शहरातून विविध ठिकाणाहून तीन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. याबाबत तक्रार वणी पोलिसात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी रविवारी दिनांक 19 सप्टेंबर वणी पोलिसांनी एका आरोपीस चंद्रपूर जिह्यातून अटक केली आहे.…

बुधवारी वणीत ओबीसी आरक्षणासंदर्भात निदर्शने

जब्बार चीनी, वणी: ओबीसींची स्वतंत्र जनगणना व ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी बुधवारी 22 सप्टेंबर रोजी ओबीसी महासंघाद्वारे राज्यभर निदर्शने केली जाणार आहे. वणीत देखील यासंदर्भात जोरदार निदर्शने करण्यात येणार आहे. आज जनता शाळेत ओबीसी…

वणीचे तहसीलदार शाम धनमने यांची बदली

जितेंद्र कोठारी, वणी: येथील तहसीलदार शाम धनमने यांची प्रशासकीय कारणास्तव देऊळगाव(राजा) येथे बदली करण्यात आली आहे. शाम धनमनेच्या जागी कोण येणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. तहसीलदार धनमने यांची बदली झाल्यानंतर तहसीलदार पदाचा प्रभार…