ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत कायम करा

सुशील ओझा, झरी: प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने ग्रामरोजगार सेवक काम करण्यास कटिबद्ध आहे. परंतु गाव पातळीवर काम…

वणीतील लोक अदालतमध्ये 694 प्रकरण निकाली

जितेंद्र कोठारी, वणी: न्यायालयात प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी वणी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. वणी येथील न्यायालय…

जामनी येथील सार्वजनिक शौचालयाचे काम निकृष्ट

सुशील ओझा, झरी: येथून दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या जामनी येथील सार्वजनिक शौचालयाचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रारीत दोषी कर्मचारी, सचिव व अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात…

गुरुनगर येथील क्रिकेट बेटिंग (सट्टा) अड्ड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील गुरुनगर भागात एका घरात सुरु क्रिक्रेट सामन्यावर सट्टा खेळताना वणी पोलिसांनी धाड टाकली. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. इरशाद खान उर्फ इशरत खान (36) रा. वणी असे अटक…

‘युग’च्या मदतीला धावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरु

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील चिमुकल्या युगला बालवयातच कॅन्सरने ग्रासले. नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट मध्ये उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शिंदोलावाशीयांनी मदतीचा हात दिला. 'वणीबहुगुणी' न्युज पोर्टलवर…

शिरपूर पोलिसांनी पकडला कोळसा तस्करी करणारा ट्रक

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत आबई फाटा ते कोरपना रस्त्यावर अवैधरित्या कोळसा घेऊन जाणारं आयशर वाहन शिरपूर पोलिसांनी पकडले. गुरुवार 23 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आयशर…

चारगाव- शिंदोला- कळमना रस्त्यासाठी कोर्टाची तारीख पे तारीख

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या चारगाव, शिंदोला ते कळमना या 17 किमी.रस्त्यासाठी नागरिकांना आणखी काही महिने वाट बघावी लागणार आहे. कंत्राटदारांच्या वर्चस्वाच्या लढाईत सुप्रीम कोर्टात दाखल या निविदेच्या सुनावणीसाठी…

तालुक्यात बेंबळाने केले शेतीचे नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: चोपण येथे बेंबळा प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची सूचना न देता त्यांच्या शेतात टाक्याचे व पाईपलाईनचे काम केले. पावसामुळे आता त्या ठिकाणी पाणी साचून पीक सडत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे…

रंगारीपुरा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रंगारीपुरा भागात राहणाऱ्या एका विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवार 24 सप्टें. रोजी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. आशिष किशोर तोडकर (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.…