तेरवीचा खर्च टाळून गोवारीच्या इद्दे परिवाराचा सामाजिक उपक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध कबड्डीपटू महादेवराव इददे यांचे गेल्या काही दिवसांआधी निधन झाले. त्यांच्या तेरवीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा खर्च टाळत इद्दे परिवाराने सामजिक बांधीलकी जपत कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला.…

शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय आवारी यांचा राजीनामा

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय आवारी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपुर्द केला. कौटुंबिक कारणांमुळे आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट…

मारेगाव नगरपंचायत निवडणूक: काँग्रेसच्या पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मारेगाव तालुक्यातील काँग्रेसमध्ये असलेली कुरबुरी व कुरखोडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सर्वात जास्त संख्याबळ असूनही पालिकेत सत्ता आणण्यात…

चिंचमंडळ येथे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस समस्त भारतवासी करीता काळा दिवस होता. याच दिवशी काश्मीर मधील पुलवामा येथे आपले कर्तव्य बजावून परत येणाऱ्या भारतीय CRPF च्या ताफ्यावर अचानक दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात ४० वीर जवान…

शिवनाळा शिवारात वाघाचा गायीवर हल्ला

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील बोटोणी परिसरात एका वाघाने गाईची शिकार करून फडशा पाडला. रविवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात शेतक-याचे 20 हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात…

जेसीआय पदग्रहण सोहळा संपन्न: रवी हनुमंते अध्यक्ष तर नवीन पोपली सचिव

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 12 फेब्रुवारी रोजी जेसीआय वणी सिटीचा पदग्रहण सोहळा सायंकाळी 8 वाजता रसोया हॉटेलमध्ये संपन्न झाला. या 9 व्या पदग्रहण सोहळा मध्ये जेसी रवी हनुमंते यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला तर सचिवपदी नवीन पोपली यांची निवड…

अविनाश लघुपटातील संपूर्ण टीमचा वणीत सत्कार

विवेक तोटेवार, वणी: रविवार 13 फेब्रुवारी रोजी वणीतील लयतरंग संगीत विद्यालयात अविनाश या लघुपटातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. बहुजन स्टुडंट्स फेडरेशन आणि युवा समरागंण बहुद्देशिय संस्था, वणी द्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

मारेगाव नगरपंचायतीमध्ये भाजपची उपाध्यक्ष, ईश्वरचिठ्ठीने निकाल

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतीमध्ये सकाळी नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेने बाजी मारत नगराध्यक्ष पद काबिज केले. अशाच नाट्यमय घडामोडी दुपारी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीही दिसून आल्या. ऐन मतदानाच्या वेळी खुद्द नगराध्यक्षच…

झरी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा… ज्योती बीजगूनवार नगराध्यक्ष

प्रतिनिधी, झरी: झरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ज्योती संजय बीजगूनवार या निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सुजाता अनमुलवार यांचा पराभव केला. विशेष म्हणजे झरी सहीत मारेगाव नगरपंचायतीवरही शिवसेनेने भगवा फडकवला…

मारेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, डॉ. मनिष मस्की नगराध्यपदी….

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येण्याची फक्त औपचारिका बाकी असताना शिवसेनेने काँग्रेसला धोबिपछाड देत मारेगाव नगर पंचायतीवर भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे डॉ. मनिष तुळशीराम मस्की हे मारेगाव नगरपंचायतीचे…