लवकरच येणार एलआयसीचा आयपीओ… गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: देशातील गुंतवणुकदार आतुरतेने वाट पाहत असलेल्या एलआयसी आयपीओचा मुहूर्त अगदी हाकेच्या अंतरावर आला आहे. शेअर बाजारातील सहभागींसाठी हा आयपीओ सणापेक्षा कमी नाही. भारतातील सर्वात मोठा आणि बंपर आयपीओ (Mega IPO) मार्चच्या…

वणी तालुक्यात ठीकठिकाणी संत रविदास महाराज जयंती साजरी  

जितेंद्र कोठारी, वणी:  समतेचे अग्रदूत संत रविदास महाराज यांची जयंती 22 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान तालुक्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभागतर्फे तालुक्यातील भालर, ब्राह्मणी, मुर्धोनी, नांदेपेरा, पुरड,…

शिंदोला येथील वासुदेवराव नागतुरे यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वासुदेवराव नागतुरे (वय 85) यांचे वृद्धापकाळाने दि. 3 गुरुवारी सकाळी (ओमनगर, चिखलगाव) वणी येथे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, चार मुली, जावई, नातवंड असा…

वणी येथील ‘त्या’ दोन्ही धान्य व्यापाऱ्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून चुकारे थकविल्या प्रकरणी व्यापाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज अमरचंद सुराणा व रुपेश नवरतनमल कोचर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे…

राजू उंबरकर यांच्या हस्ते मराठी भाषा संवर्धन संस्थेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

जितेंद्र कोठारी, वणी:  27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्था ढाणकी ता. उमरखेड या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ www.mlcmo.org चे लोकार्पण मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याहस्ते करण्यात…

शिंदोला येथील क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील नवयुवक क्रिकेट क्लब द्वारा घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि. 26 फेब्रुवारी शनिवारला पार पडला. स्पर्धेत 70 संघांनी सहभाग घेतला. परिसरातील खेळाडू आणि प्रेक्षकांचा…

वणी एसटी डेपोतील संपकरी कर्मचाऱ्याला मारहाण

विवेक तोटेवार, वणी: संपावर असलेल्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्याला कामावर का येत नाही, म्हणून एस.टी.कामगार संघटनेचे सचिव व एकाने जबर मारहाण केली. रविवार 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास वणी बस स्थानक परिसरात ही घटना घडली. एसटी…

वणी येथील ‘अभिनयन’ सुखरुप परतणार मायदेशी

जितेंद्र कोठारी,वणी: युद्धग्रस्त युक्रेन देशात  अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ऑपरेशन गंगा मोहीम अंतर्गत मागील दोन दिवसात 469 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यात…

पंचायत समिती कार्यालयातअग्नितांडव निमित्याने अनेक प्रश्न उपस्थित..!

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवार 25 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजता पंचायत समितीच्या उमेद अभियान कार्यालयात घडलेल्या भयंकर अग्नितांडव निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. तालुका व्यवस्थापन, पशुसंवर्धन व बचत गटाचे संपूर्ण दस्तावेज…

किराणा माल व बॅटरी चोरणाऱ्या तिघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: दुकाने फोडून किराणा सामान लंपास करणाऱ्या एका चोरट्याला तसेच उभ्या ट्रकच्या दोन बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. तिघांकडून पोलिसांनी 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विकास उर्फ…