आज व उद्या वणीत गीत रामायणाचा कार्यक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: गुढीपाडव्यापासून वणीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारी व गुरुवारी दिनांक 6 व 7 एप्रिल रोजी इंदोर येथील अभय मानके यांचा संगीतमय गीत रामायणाच्या…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे निरोप समारंभ

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे अधीक्षक विजय बहादुरे यांची पुसद येथे बदली झाल्यानिमित्त त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी वर्ग 10 वी, 12 वी तसेच पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील…

मारेगावमध्ये लाचखोर अधिकारी व लिपिकास रंगेहात अटक

भास्कर राऊत, मारेगाव: शेतीची मोजणी लवकर करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी मारेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी व लिपिकाला अँटी करप्शन ब्युरो अमरावती यांनी रंगेहात पकडले. लिपिक चंद्रकांत अविनाश पाटील व अधिकारी बबन…

तब्बल दोन लाखात पडले टरबूज… भामट्यांनी साधला डाव

जितेंद्र कोठारी, वणी: शेती विकत घेतल्याने त्याचे बाकी असलेले पैसे देण्यासाठी दोन लाख रुपये बँकेतून काढले. उन्हाळा असल्याने त्यांनी मध्येच टरबूज खरेदी करण्यासाठी गाडी थांबवली व टरबूज विकत घेतले. मात्र दरम्यान भामट्यांनी डाव साधत त्यांच्या…

कोंबड बाजारावर पोलिसांची धाड, सात जुगाऱ्याना अटक

जितेंद्र कोठारी, वणी :  वणी भालर मार्गावर धोपटाळा तलावाच्या मागे झाडा झुडपात लपून छपून सुरु असलेल्या कोंबड बाजारावर वणी पोलिसांनी रविवार 3 एप्रिल रोजी धाड टाकून 7 जुगाऱ्याना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 35 हजार…

तारेन्द्र बोर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धा व रुग्णवाहिका लोकापर्ण सोहळा

जितेंद्र कोठारी, वणी: वणीचे माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार 4 एप्रिल रोजी भव्य मॅराथॉन स्पर्धा व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

बत्राजी की दाबेली रविवारपासून नवीन ठिकाणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुप्रसिद्ध दाबेली सेंटर असलेल्या बत्राज स्नॅक्स पॉईंट (बत्राजी की दाबेली) आज रविवारी दिनांक 3 एप्रिलपासून जैन स्थानक रोड टागोर चौक येथे स्थानांतरीत होत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता या नवीन ठिकाणी येऊन दाबेलीचा…

ग्राहकांच्या खास डिमांडवर आज पुन्हा लांबपोळ्या व मटन, चिकनचा बेत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वरोरा रोड वरील गावरान तडका येथे आज पुन्हा एकदा ग्राहकांच्या डिमांडवर रविवार स्पेशल लांब पोळ्या (लंब्या रोट्या) मटण, चिकनचा बेत आखण्यात आला आहे. याशिवाय या रेस्टॉरन्टमध्ये तंदूर…

माऊली ग्रुपतर्फे पारायण व महाप्रसादचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: गुडीपाडव्याच्या निमित्याने नववर्षाचे स्वागत माऊलीच्या नामस्मरण व भक्तिभावाने साजरा करण्यासाठी श्री माऊली ग्रुपतर्फे छोट्या पोथीचे पारायण सोहळा आयोजित करण्यात आला. जिजाऊ नगर येथील गजानन महाराज मंदिरात आयोजित या…

…आणि वाढत्या महागाईमुळे केले चक्क मोदी सरकारचे अभिनंदन

जितेंद्र कोठारी, वणी: दिवसेंदिवस वाढणारी महागाई, पेट्रोल, डिझेलचे रोज वाढणारे दर इत्यादी विरोधात आज वणीत शिवसेना प्रणीत युवासेनेतर्फे थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता शिवतीर्थासमोर या उपाहासात्मक आंदोलनाला सुरुवात झाली. सततच्या…