भर दिवसा ठगांनी महिलेला लुटले… लाखोंचे दागिने लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात चोरट्यांनी धुमाकूळ सुरु असतानाच आता चोरट्यांनी चक्क पोलीस असल्याची बतावणी करून एका महिलेला लुटले. भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर आज दुपारी ही घटना घडली. या घटनेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील सोन्याच्या…

चोपण येथे रंगला कब बुलबुल मेळावा, चिमुकल्यांचे नृत्य ठरले प्रमुख आकर्षण

भास्कर राऊत, मारेगाव: डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या सदाबहार नृत्यांनी चोपण येथील कब बुलबुल मेळाव्याची सांगता झाली. शुक्रवारी दि. 6 जानेवारीला घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गोहोकर होत्या तर कार्यक्रमाचे उदघाटन…

वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष पथकाद्वारे सर्च ऑपरेशन सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: 27 डिसेंबर रोजी निलजई कोळसा खाणीत (ओपन कास्ट) ऑन ड्युटी असलेल्या एका कर्मचा-यावर वाघाने हल्ला केला होता. या हल्ल्यात कर्मचारी जखमी झाले होते. वाघाने थेट खाण परिसरात एन्ट्री केल्याने कर्मचारी चांगलेच दहशतीत आले आहे. आता…

आजपासून दोन दिवस क्रां. सावित्रीबाई फुले वाचनालयात विविध स्पर्धेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील विठ्ठलवाडी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयानिमित्त वणीमध्ये 7 व 8 जानेवारीला विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त या स्पर्धा होणार आहे. ७ जानेवारी २०२३…

दीपक टॉकीज चौपाटी परिसर बनला मटका पट्टीचा अड्डा

जितेंद्र कोठारी, वणी: वणीत दीपक चौपाटी परिसरातील सुरू असलेल्या 2 मटका पट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी दोन मटका पट्टी फाडणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक धाड ही दीपक टॉकीज चौपाटी जवळ तर दुसरी धाड ही…

वेगाव येथे घराला भीषण आग, शेतक-याचे मोठे नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वेगाव येथील एका घराला भीषण आग लागली. गुरुवारी दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यात मोठ्या प्रमाणात घरमालकाचे नुकसान झाले आहे. वेगाव…

प्रयोगशील शेतकरी डॉ. दिलीप अलोणे यांना कृषी वैभव पुरस्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्रयोगशील शेतकरी, शेती मित्र डॉक्टर दिलीप अलोने यांना नुकतेच कृषी वैभव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले खुलताबाद येथे स्वदेश बायोटेक यांच्या वतीने आयोजित सेंद्रिय शेती अभियान मेळाव्यात संस्थापक दिलीप देशमुख यांच्या…

मारेगाव तालुक्यात आणखी एक शेतकरी आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील रामेश्वर येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7 ते 8 च्या दरम्यान उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव प्रमोद व्यंकटेश एकरे असून वय अंदाजे 41 असे आहे.…

मुख्य मार्गांवर उभ्या राहणाऱ्या ट्रक व इतर वाहनांवर कार्यवाही करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या काही दिवसांपासून मुख्य मार्गांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहे. यात अनेकांना जीवही गमावावा लागला आहे. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. रस्त्यांवर उभी राहणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत…

शेतकऱ्यांचे धान्य चोरी करून विकणाऱ्यास अटक

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरदरा शेतशिवारातून 3 क्विंटल चना चोरी करून वणी येथे विकणाऱ्या चोरट्यास वणीतून स्थानीय गुन्हे शाखेने अटक केली आहे. सोबतच या गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.…