बसमध्ये वाहकाला हृदयविकाराचा धक्का, कर्तव्यावर असलेल्या वाहकाचा मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी वरून चंद्रपूरला जाणा-या बसमध्ये वाहकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. किशोर घरत (48) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे. ते मुळचे यवतमाळ येथील असून ते वणी आगारात वाहक या पदावर कार्यरत होते. …

वणीत 2 ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना, हँडल लॉक केलेल्या दुचाकीही चोरी…

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात चोरट्यांचा हैदोस काही केल्या कमी होताना दिसत नाही. बंद घर फोडण्याच्या घटना सुरू असतानाच आता घरासमोर लॉक करून ठेवलेल्या दुचाकीही चोरटे पळवायला लागले आहे. नुकतेच दोन दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील…

साउथचा सुपरस्टार थलपथी विजयचा वारीसू सिनेमा रिलीज….

बहुगुणी डेस्क, वणी: साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयने वारीसू या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. इमोशनल फॅमिली ड्रामा आणि अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटात विजय पुन्हा एकदा त्याच्या जुन्या स्टाइलमध्ये दिसला आहे. 11 जानेवारीला हा…

ब्रेकिंग न्यूज: शिवसेना (शिंदे) गटाला मोठा धक्का, यवतमाळ जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा ?

जितेंद्र कोठारी, वणी: शिवसेना (शिंदे) गटाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष गजानन बैजंकीवार यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिल्याच्या चर्चेमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. संजय राठोड यांचे खंदे समर्थक गजानन बैजंकीवार यांची 2…

इंजी. दिलीप अग्रवाल यांना पितृशोक

वणी बहुगुणी डेस्क :  येथील ख्यातनाम बिल्डिंग इंजिनिअर दिलीप अग्रवाल यांचे वडील रतनलाल अग्रवाल (77) यांचे शुक्रवारी पहाटे 4 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता त्यांचे राहते घरी जिल्हा परिषद शाळा…

कोसा-याजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, युवक ठार

भास्कर राऊत, मारेगाव: एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेल्या एका युवकाच्या दुचाकीचा परतताना भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सुहास उर्फ गोलू गजानन आडे (18) असे मृत युवकाचे नाव असून तो तालुक्यातील बुरांडा येथील रहिवासी होता.…

बोटोणी येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील बोटोणी येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कवडू यादव उर्फ चांदोबा नेहारे (64) असे आहे. ते अल्पभूधारक होते. दुपारी त्यांनी नायलॉनच्या दोरीने…

प्रवीण उंबरकर यांची जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ जिल्हा कंत्राटदार (कल्याण) संघटना (रजी नं 2274) च्या अध्यक्ष पदावर वणी येथील शासकीय कंत्राटदार प्रवीण उंबरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बुधवार 11 जानेवारी रोजी यवतमाळ येथील नवजीवन मंगल कार्यालयात पार…

परिसरात कोळसा तस्करांची धूम – 22 लाखांचा कोळसा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस व स्थानिक गुन्हा शाखा पथकाने (LCB) मोठी कारवाई करत मुकुटबन येथील खासगी कोलमाईन्स मधून अवैधरीत्या कोळशाची वाहतूक करीत असलेले 8 हायवा ट्रक ताब्यात घेतले. बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमाास वणी मुकुटबन मार्गावर…