वणी ते कोलारपिंपरी रस्ता ठरतोय जीवघेणा

जब्बार चीनी, वणी : बामणी फाटा ते कोलारपिंपरी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. हा रस्ता नागरीकांसाठी जीवघेणा ठरत आहे.मात्र याकडे शासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यानंतर शासन व लोकप्रतिनिधींना जाग येणार…

सेवानिवृत्त शिक्षकाला 58 लाखांचा गंडा घालणारा नटवरलाल अटकेत

विवेक तोटेवार, वणी: गणेशपूर येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाला व्याजाचे आमिश दाखवून 58 लाख रुपयांची टोपी टाकणा-या नटवरलालच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. कन्हैया देवनारायण दास (37) रा. नेगुरा ता. कमालपूर जि. चंदोली उत्तर प्रदेश हल्ली…

 पाटण मध्यवर्ती बँक मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात १ कोटी ११ लाख १६ हजार जमा

सुशील ओझा,झरी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण यांच्या मार्फत १२ एप्रिल पासून आदिवासी विकास विविध कार्यकारी १०५ सभासदांचे किसान क्रेडिट कार्ड (के. सी .सी) चे वाटप करण्याचा कार्यक्रम झाला. तालुक्यातील १०५ शेतकऱ्यांचे २०४.४२…

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला असून आरोग्य विभागाला काल मिळालेल्या अहवालानुसार मारेगाव तालुक्यात चक्क 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 171 वर…

45 लाखांच्या लूटमार प्रकरणी आणखी एक आरोपी गजाआड

जितेंद्र कोठारी, वणी: 45 लाखांच्या दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पुखराज चौधरी असे या संशयीताचे नाव असून त्याला वणीतील मुकुटबन रोडवरील मारोती टाउनशिप येथून अटक केली. त्याच्यावर मास्टरमाइंड…

कोरोनाचा प्रकोप सुरूच, आज 47 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याची अद्याप कोणतेही चिन्ह नाहीत. आज शनिवारी दिनांक 17 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 47 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 16 रुग्ण तर ग्रामीण भागातील 29 रुग्ण आहेत.…

45 लाखांच्या दरोड्यातील सूत्रधाराला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग व्यवस्थापकाला मारहाण करून भर दुपारी 45 लाखांची लूटमार प्रकरणी अटक मुख्य आरोपी बाबूलाल बिश्नोई याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 20 एप्रिल पर्यंत पोलीस…

मुकुटबन ग्रामपंचायतीची कोट्यवधींची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या गट क्रमांक 87 व 15 यात असणा-या कोट्यवधी रुपयांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्या काही वर्षांपासून या जागेतील सुमारे 80…

तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच, आज 78 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या रोज नवनवीन रेकॉर्ड करताना दिसत आहे. आज शुक्रवारी दिनांक 16 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 78 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 31 तर ग्रामीण भागातील 41 रुग्ण आढळले आहे. यात…

मुकुटबन पोलिसांनी पाठलाग करून पकडली 10 पेट्या दारू

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमध्ये दारूविक्री बंद असल्याने दारुच्या अवैधरित्या वाहतुकीत वाढ झाली आहे. पोलिसांनी मुकुटबन-पाटण रोडवर एका कारमधून दारू तस्करी करणा-यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत देशी दारुच्या 10 पेट्या…