बेपत्ता झालेल्या तरुणाचा अखेर सापडला मृतदेह

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील एका तरुणाचा आज मंगळवारी दिनांक 8 जून रोजी मृतदेह आढळला. पेंढरी येथील शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत हा तरुण आढळला. मंगल शामराव कुमरे असे या तरुणाचे नाव आहे. कालपासून तो बेपत्ता होता.…

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

विवेक पिदूरकर: सध्या लॉकडाऊनमुळे वर्क फॉर्म होमचे चलन वाढले आहे. सततच्या कामामुळे कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर याचा लोड येतो. परिणामी लॅपटॉप कॉम्प्युटर स्लो होणे, हॅंग होणे अशा अडचणी वाढल्या आहेत. याशिवाय वाढत्या कामामुळे अचानक कॉम्प्युटर,…

अखेर दीड महिन्यानंतर मृत्यूशी झुंज थांबली

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुपरिचित व्यावसायीक व महादेव मोटर्सचे संचालक सचिन भोजराजजी ठाकरे (40) यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले. सोमवार सायंकाळी 7.30 दरम्यान नागपूर येथे मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत…

येदलापूर बांधकाम प्रकरणी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’

सुशीलओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे बिल काढण्यासाठी सध्या ठेकेदाराचा खटाटोप सुरू आहे. या प्रकरणी नेत्यांनी निवेदन दिले तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र ना पुढे आंदोलन झाले, ना…

आज तालुक्यात एकही रुग्ण नाही, आता अवघे 31 ऍक्टिव्ह रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे एकही रुग्ण आढळले नाहीत. याशिवाय आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 31 झाली आहे. आज जरी यवतमाळहून एकही रिपोर्ट प्राप्त झाला नसला तरीही…

अनलॉक होताच तिस-या लाटेसाठी वणीकरांकडून स्वागत…!

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनापासून काहीसा दिलासा मिळाल्यानंतर सोमवार 7 जून पासून जिल्ह्यातील सर्व निर्बंध मागे घेण्यात आले. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडल्याने शहरातील रस्त्यांवर सकाळ पासूनच मोठी गर्दी झाली. बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळ वाढली तर…

मारेगाव तालुक्यात अवघे 13 ऍक्टिव्ह रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्ती कडे वाटचाल होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. आज सोमवारी दिनांक 7 जून रोजी आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर दुसरीकडे…

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या खिशाला वाढत्या इंधन दरवाढीने कात्री लागत आहे. पेट्रोलने 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे तर डिझेलची किंमतही 90 रुपयांच्या वर गेली आहे. ही दरवाढ अशीच…

वणीची अनुष्का सिंग विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तिसरी

जब्बार चीनी, वणी: येथील नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालयाची बी कॉम तृतीय वर्षाची विद्यार्थिनी अनुष्का सिंह ही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात वाणिज्य स्नातक परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसरी आली आहे. तिच्या या यशाबाबत…

परमडोह येथे कोविड लसीकरण शिबिर

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील परमडोह येथे शुक्रवारी कोविड लसीकरण शिबिर आयोजित केले होते. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पार पडलेल्या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन सरपंच मधुकर वाभिटकर यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच संदीप…