नंदेश्वर देवस्थान येथे पार पडले रक्तदान शिबिर

जब्बार चीनी, वणी: दिनांक 1 सप्टेंबर रोजी वणीतील जगन्नाथ महाराज नंदेश्वर देवस्थानात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मराठा सेवा संघाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ व संभाजी…

ढाकोरी-बोरी मार्गावर रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन

तालुका प्रतिनिधी, वणी: चारगाव ते ढाकोरी बोरी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी पावसाच्या दिवसात पाणी साचलेल्या खड्डयांचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याकडे बांधकामविभागाचे दुर्लक्ष होत आहे. म्हणून सदर रस्त्याची…

घरफोडी करणा-या 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील डोर्ली येथील महादेव प्रकाश भोयर व मधूकर भोयर यांच्या घरी दिनांक 17 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरी झाली होती. एका घरफोडीत चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम असा सुमारे 13 हजार हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. तर…

वणी शहरात दुपारी विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस

जितेंद्र कोठारी, वणी: आज दुपारी पावसाने उग्र रुप धारण केले. दुपारी 3 नंतर शहरात धुवाधार पाऊस पडला. हा पाऊस सुमारे 2 तास सुरू होता. त्यानंतर एक ते दिड तास पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने रस्त्याला नाल्याचे…

मारहाण प्रकरणी बापलेकास दंडाची शिक्षा

भास्कर राऊत, मारेगाव: शुल्लक वादावरून केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपी बापलेकाला 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मारेगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मारेगाव एन.पी. वासाडे यांनी हा निर्णय दिला आहे. अनिल देवराव आस्वले व…

अनिल ताजने झाले चिखलगावचे उपसरपंच

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत अनिल ताजने यांची उपसरपंच पदी निवड झाली. अनिल ताजने यांनी आपले विरोधी उमेदवार रुपाली सुनील कातकडे हिचा 3 मतांनी पराभव केला. या पराभव कातकडे गटाला धक्का…

झरी तालुक्याची शामादादा कोलाम संघटना गठीत

सुशील ओझा, झरी: झरी येथे 29 ऑगस्ट रोजी पाटणाई देवस्थान येथे शामा दादा कोलाम संघटनेची झरी तालुक्याची नविन कार्यकारणी समिती गठीत करण्यात आली. यात तालुका अध्यक्ष म्हणून कैलास लालुजी आत्राम, उपाध्यक्ष पांडु चिनू टेकाम, देवा गोली टेकाम यांची…

लाठीकाठीचे ‘वस्ताद’ जनार्धन भरणे यांचे वृद्धापकाळाने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील जनार्धन भरणे यांचे दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज गुरुवारी दुपारी 1 वाजता राजूर कॉलरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते…

रासा शिवारात वाघाचा बैलावर हल्ला, बैल जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: वाघाच्या हल्यात बैल जखमी झाला. सदर घटना आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान रासा-सुकणेगाव शिवारात घडली. वेळीच परिसरात असलेल्या शेतमजुरांनी आरडाओरड केल्याने बैलाचा जीव वाचला आहे. मात्र या हल्ल्यामुळे…

श्रावणी गणेश मूर्ती मॉलमध्ये मातीच्या मूर्ती उपलब्ध

विवेक तोटेवार, वणी: वणीतील महाराष्ट्र बँकेजवळील श्रावणी गणेश मूर्ती मॉल येथे मातीच्या विविध प्रकारच्या व आकाराच्या गणेश मूर्ती वाजवी दरात उपलब्ध आहेत. यासह गणपती डेकोरेशनचे व पुजेचे साहित्यही उपलब्ध आहेत. त्यामुळे हा गणेशोत्सव इको फ्रेंडली…