गोडगाव शिवारात वाघाचा गायीवर हल्ला, गाय ठार

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दुपारी गोडगाव शिवारात वाघाने गायीवर हल्ला करून गायीला ठार केले.  आज शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून गोडगाव शिवारात वाघाचा मुक्त संचार असून वाघाच्या सततच्या हल्यामुळे परिसरातील शेतकरी…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर (कॉलरी) येथील एका 15 वर्षाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.…

लिंगटी येथे शेतात बापलेकांवर कोसळली वीज, एकाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, झरी: लिंगटी येथे आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास वादळी वा-यासह धुवाधार पाऊस झाला. या पावसात शेतात वीज कोसळून लिंगटी येथील वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. शेख जब्बार शेख मेताब (अंदाजे 65) असे वडिलांचे नाव आहे.…

महाविकास आघाडी सरकार अमरपट्टा घेऊन आली नाही- देवेंद्र फडणवीस

जितेंद्र कोठारी, वणी: आज रोजी राज्यात महाविकास आघाडीची सरकार आहे, उद्या आमची सरकार येईल. महाविकास आघाडी सरकार शासन करण्याचा काही अमरपट्टा घेऊन आलेली नाही. परिवर्तन हे लोकशाहीचे नियम आहे. असे उद्गार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेत…

नवजात बाळाची विक्री करण्याचा डाव उधळला

जितेंद्र कोठारी, वणी: एका 15 दिवसांच्या नवजात बाळाची विक्री करण्याचा घाट उधळून लावण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी वणीतील एका सामाजिक संस्थेची संचालिकाच बाळाचा सौदा करण्यात मधस्थी करीत असल्याचे समोर आले आहे. दत्तक देण्याच्या…

निष्ठेने कार्य केल्याचे फळ कायम उत्तमच असते: गोहोकर

भास्कर राऊत मारेगाव: आपले काम ही आपली पूजा समजून निष्ठेने केले तसेच मिळालेले कार्य जर आपण नेमाने करीत राहिलो तर त्याचे अंतिम फळ हे उत्तमच असते, असे प्रतिपादन नुकतेच सेवानिवृत्त झालेले नायब तहसीलदार डी. जे. गोहोकर यांनी केले. सेवनिवृत्तीपर…

शिंदोला माईन्स येथे रक्तदाब तपासणी शिबिर संपन्न

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील असोसिएटेड सिमेंट कंपनीत जागतिक हृदय दिनानिमित्त दि. 29 सप्टेंबर बुधवारला ऑक्यूपेशनल हेल्थ सेंटरच्या वतीने रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन कंपनीचे जनरल मॅनेजर सुरेश…

वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या आठवड्यात वणी उपविभागात अतीवृष्टी झाली. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच गुलाब चक्रीवादळाचा फटकाही मोठ्या प्रमाणात शेतक-यांना बसला. वणी उपविभाग हा सततच्या नापिकीने शेतकरी…

वणी तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात मागील 15 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यात हजारो हेक्‍टरवरील पिकांची नासाडी झालेली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील कापसाची बोंडे सोडत आहे. सोयाबीनला कोंब फुटले आहे तसेच तुरीचे…