नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंगवर वाहतुकीचा खोळंबा

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा मार्गावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगमुळे दररोज तासंतास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वणी मुकुटबन आदिलाबाद तसेच वणी ते राजूर (कॉलरी) जाणाऱ्या दोन्ही रेलमार्गावर असलेली फाटक दिवसभरात अनेक वेळा बंद राहते.…

मोमिनपुरा येथे चिमुकल्यावर अॅसिड अटॅक

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे आज दिनांक 26 डिसेंबर रविवार सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास एका 5 वर्षीय चिमुकल्यावर ऍसिड फेकल्याची घटना घडली. सदर अॅसिड हे बॅटरी वॉटर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत चिमुकल्याला जखम झाली नसली…

सायकलीस्ट प्रणाली चिकाटे हिचे सोमवारी वणीत आगमण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पर्यावरणाचा संदेश घेऊन महाराष्ट्रभर सायकलने भ्रमंती करणारी सायकलीस्ट प्रणाली चिकाटे हिचे सोमवारी वणीत आगमण होणार आहे. तिच्या या कार्याबाबत परिसरात ठिकठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2020 पासून  प्रणाली…

मार्डी-खैरी रोडवर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, एक ठार तर एक गंभीर

सुरेश पाचभाई, बोटोणी: वणीत गाडी बघून गावी परतत असताना एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. मार्डी ते खैरी रोडवर संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला तर मागे बसलेला त्याचा सहकारी जखमी झाला.…

दारुच्या पव्व्याने केला घात, अपघातात काच पोटात जाऊन तरुणाचा मृत्यू

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगावहून गावी परत जाणा-या दुचाकीसमोर अचानक म्हैस आडवी आली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी खाली पडली. यात कमरेत ठेवलेले दारूचे पव्वे फुलटे व त्याचे काच पोटात गेल्याने चालकाचा मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी…

कोरपना ते वणी मार्गाचे चौपदरीकरण करावे, आमदारांना निवेदन

तालुका प्रतिनिधी, वणी: चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोरपना ते वणी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता युवा…

मुस्लिम समाजाला शासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण द्या

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील मुस्लिम समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय मागासलेला आहे. मुस्लिम समाजास शैक्षणिक आणि शासकीय 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय 2014 मध्ये झालेला आहे. या निर्णयाची मात्र अंमलबजावणी झालेली नसून मुस्लिम…

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला जागा देण्यास आक्षेप नाही- आ. बोदकुरवार

जितेंद्र कोठारी, वणी: केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला जागा उपलब्ध करून देण्यास माझा काहीही आक्षेप नाही. मात्र यवतमाळ येथील माँ अन्नपूर्णा बहुद्देशीय प्रसारक मंडळ या संस्थेला नगरपरिषद मालकीची 20 हजार स्के. फूट जागा देण्यास माझा आक्षेप आहे.…

द बर्निंग कार : भांदेवाडा येथे धावत्या कारला आग

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील प्रख्यात श्रीक्षेत्र भांदेवाडा तीर्थक्षेत्र परिसरात शुक्रवारी एका बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. सायंकाळी 5.15 वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेत कार चालकाचे प्राण थोडक्यात वाचले. माहितीनुसार एक हुंडाई…

संस्थेला जागा देण्यावरून नगराध्यक्ष आणि आमदार ‘आमने-सामने’

जितेंद्र कोठारी, वणी: नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना एका वादग्रस्त ठरावावरून येथील आमदार आणि नगराध्यक्ष यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहे. नगरपरिषदच्या मालकीची तब्बल 20 हजार स्क्वेअर फूट जागा यवतमाळ येथील एका संस्थेच्या…