नवे निर्बंध लागु, मात्र अंमलबजावणी यंत्रणाच शिथिल

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोना व ओमायक्रोन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने रविवार 9 जाने. रात्रीपासून नवे निर्बंध लागू केले आहे. मात्र निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे…

बँकेतून काढलेल्या पैशावर गावातीलच तरुणाचा डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पुनवट येथील एका शेतक-याच्या घरी चोरी झाली होती. याची तक्रार 6 जाने. रोजी नोंदवण्यात आली होती. तक्रार दाखल होताच शिरपूर पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा…

योगेश चिंडालिया यांना विधी स्नातक पदवी

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील व्यावसायिक योगेश मंगल चिंडालिया यांनी गोंडवाना विद्यापिठाची विधी स्नातक ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. ते सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे. नुकताच गोंडवाणा…

रेखाताई कुमार आंबटकर यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सर्वोदय चौक येथील रहिवाशी असलेल्या रेखाताई कुमार आंबटकर यांचे शुक्रवारी रात्री 11.02 मिनिटांनी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 61 वर्षांच्या होत्या. त्या डॉ. कुमार आंबटकर यांच्या पत्नी होत्या. गेल्या वर्षी डॉ.…

विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नये: ठाणेदार शाम सोनटक्के

जितेंद्र कोठारी, वणी: जीवनातील एक छोटीशी चूक आपले उभे आयुष्य बरबाद करु शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाईट मार्गाने न जाता योग्य मार्गाची निवड करावी. तरुण वयातील मुलांनी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे न वळता समाजामध्ये चांगला आदर्श निर्माण करावा.…

अपघात: ट्रकची दुचाकीला धडक, युवक ठार

जितेंद्र कोठारी, वणी: सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना गुरुवार 6 डिसें. रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान राजूर फाटा येथे घडली. या अपघातात गंभीररित्या जखमी दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाला.…

जागृत पत्रकार संघाद्वारे पत्रकार दिन साजरा

विवेक तोटेवार, वणी: वणीतील शासकीय विश्रामगृह येथे 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन जागृत पत्रकार संघाद्वारे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात इजहार शेख जिल्हा उपाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँगेस यवतमाळ, नगरसेवक…

धारदार शस्त्रासह धुमाकूळ घालणाऱ्या युवकास अटक

जितेंद्र कोठारी, वणी: लोखंडी धारदार शस्त्र हातात घेऊन धुमाकूळ घालत असताना एका युवकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे. मो. समीर मो. गनी (20) असे अटक करण्यात आलेले युवकाचे नाव आहे. शहरातील रंगनाथ नगर भागातुन बुधवारी सायंकाळी 6.30 दरम्यान त्याला…

घोन्सा येथे शाळेच्या मैदानात शेतक-याची विष पिऊन आत्महत्या

दिलीप काकडे, घोन्सा: घोन्सा येथील एका शाळेच्या मैदानात एका 50 वर्षीय इसमाने मोनोसिल हे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. बंडू रामचंद्र बद्रे असे या इसमाचे नाव असून ते सोनेगाव येथील रहिवाशी होता. बुधवारी दिनांक 5 जानेवारी ला दुपारी 4 वाजताच्या…

गंडा..! ऑनलाईन कपडा खरेदी पडली महागात

जितेंद्र कोठारी, वणी: वेबसाईटवरुन ऑनलाईन कपडे खरेदी करून परत करणे एका शिक्षिकेला चांगलेच महागात पडले. रिफंडच्या नावावर शिक्षिकेच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्यानी 3 दिवसात तब्बल अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. लाखोंची ऑनलाईन फसवणूक…