वणी बहुगुणी इम्पॅक्ट: अखेर शिवनाळा वासियांना मिळाला डांबरी रस्ता

सुरेश पाचभाई, बोटोणी: शिवनाळा पासून यवतमाळ हायवेला जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. याबाबत 'वणी बहुगुणी'ला वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले व इस्टिमेटनुसार कामास सुरूवात झाली.…

गणेशपूर येथे महिलांच्या स्नेहमिलनाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रामाता राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्त अभिवादन व स्नेहमिलन सोहळा गणेशपूर येथील चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ सभागृहात पार पडला. यावेळी उपस्थित महिलांना कायदेविषयक…

मछिंद्रा येथे गाय व गो-ह्यावर वाघाचा हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला करून गोऱ्हाला ठार केले. तर वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील मछिंद्रा येथे रविवार 30 जानेवारीच्या रात्री दरम्यान ही घटना घडली. मछिंद्रा येथील शेतकरी…

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नांदेपेरा येथे शाखा स्थापन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील नांदेपेरा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा स्थापन करण्यात आली आहे. चंद्रज्योती शेंडे उपसभापती पंचायत समिती वणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी…

वंचित महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. काजोल गायकवाड

जितेंद्र कोठारी, वणी: वंचित बहुजन पक्ष महिला आघाडीच्या वणी तालुकाध्यक्षपदी डॉ. काजल गायकवाड (गवई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंचित महिला आघाडी जिल्हाध्यक्षा धमवंती वासनिक यांनी ही नियुक्ती केली आहे. डॉ. काजोल या वैद्यकीय क्षेत्रात…

मारेगावातील विश्रामगृहाजवळ भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगावहून गावी परत जाणा-या एका दुचाकीस्वाराच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आज संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विकास बबन डाहुले (29) असे मृतकाचे नाव असून…

मटका धाड प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकारा-या आरोपी केल्याने काँग्रेस आक्रमक

जितेंद्र कोठारी, वणी: आयजीच्या पथकाने वणीतील चार मटका अड्ड्यावर शनिवारी धाड टाकली. यात सुमारे 40 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र या प्रकरणात आरोपी म्हणून काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांचे नाव आल्याने काँग्रेस चांगलीच आक्रमक…

रेतीच्या अवैध व्यवसायाला पाठबळ कोणाचे?

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यामध्ये अवैध रेतीचा व्यवसाय सध्या जोमात सुरू आहे. रात्रभर चालणा-या अवैध रेतीच्या वाहतुकीमुळे नागरिकांना तर त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय शासनाचा महसूलही बुडत आहे. या अवैध व्यवसायाला नेमके पाठबळ कोणाचे…

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणार उलथापालथ ?

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव शहरात सध्या नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. यावरूनच सर्व नेत्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. तर एका राजकीय पक्षामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर धुसफूस बघायला मिळत आहे. जर…

ग्रामीण रुग्णालय परिसरातील डीपीने घेतला पेट, रुग्णालय अंधारात

जितेंद्र कोठारी, वणी: रिव्हर्स घेणा-या एका ट्रकने इलेक्ट्रिक पोलला जबर धडक दिली. या धडकेमुळे नजिक असलेल्या डीपीने अचानक पेट घेतला. ग्रामीण रुग्णालय परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. डीपी जळाल्याने ग्रामीण रुग्णालयाची लाईट गेली…