ब्रेकिंग न्यूज : वणी तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती उद्भवण्याचा इशारा

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. वणी तालुक्यात वर्धानदी व पैनगंगा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अपर वर्धा व लोअर वर्धा…

पूरग्रस्त गावात चा-याची भीषण टंचाई, जनावरे उपाशी…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील 11 गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे जनावरे, बि-बियाणे, खते तसेच जनावरांचा चारा पुराच्या पाण्याने वाहून नेला. तर अनेक शेतक-यांचा चारा पाण्यामुळे सडला आहे. त्यामुळे आता…

चक्क 100 टक्के गुण घेऊन वणीची ‘वैष्णवी’ नोएडात चमकली

जितेंद्र कोठारी, वणी: येथील बँक कॉलनी भागात रहिवासी आणि हल्ली नोएडा (दिल्ली) येथे आई वडीलांसह वास्तव्यास असलेल्या वैष्णवी विनोद कापसे हिने सीबीएसई 10 वीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून राज्याबाहेर वणी शहराचे नाव लौकिक केले आहे. वैष्णवी…

वणीकरांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच

विवेक तोटेवार, वणी: सध्या पूर परिस्थिती ओसरली असून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. पवन एकरे व मित्रमंडळातर्फे पूरग्रस्तांसाठी ब्लँकेट, भोजन व औषधी वाटप तर लगान क्रिकेट क्लब तर्फे अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. सध्या…

चिखलगाव येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी चोरी

जितेंद्र कोठारी, वणी : पती-पत्नी गाढ झोपेत असताना घराचा मागील दार खोलून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली. शहरालगत चिखलगाव येथे गुरुवारी रात्री 12.30 वाजता दरम्यान ही घटना उघडकीस आली. चिखलगाव येथील रहिवासी…

न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून दीपक छाजेड तर सचिव म्हणून परशुराम पोटे यांची अविरोध निवड करण्यात आली. शहरातील शासकीय विश्रामगृहात बुधवारी दिनांक 20 जुलै रोजी…

पूरग्रस्त गावांमध्ये आजपासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्‍यातील रांगणा, भुरकी, जुनी सावंगी, जुनाड, शेलु (खु), झोला, कोना, उकणी अशा अकरा गावात पुराने थैमान घातले होते. पुराचे पाणी ओसरले आहे. गावकरी गावात परत गेले आहेत. मात्र आता गावात रोगराई पसरण्याची भीती आहे.…

मनसे कडून पूरग्रस्तांना अन्नधान्याचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात नैसर्गिक आपत्तीची सर्वाधिक झळ कोना या गावाला बसली. येथील 849 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले तर 45 जनावरांना हलविण्यात आले होते. सध्या पूरपरिस्थिती नियंत्रणात असून बधितांना मदतीची नितांत गरज लक्षात घेता…

पूर ओसरला… गावात फक्त चिखल, अनेक घरांचे नुकसान

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या गावातील पुराचे पाणी ओसरले आहे. शिवाय पाटाळ्याच्या पुलाचे पाणी देखील ओसरले आहे. त्यामुळे चार दिवसानंतर आज पुलाचे दर्शन लोकांना झाले. मात्र पुरामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अद्यापही या…

पुराने घेतला शेकडो पशूधनाचा जीव, रात्रीत झाले होत्याचे नव्हते…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पुराने शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेती तर पुराच्या पाण्याने खरवडली त्यामुळे शेतक-यांचे नुकसान तर झालेच सोबतच अनेक शेतक-यांच्या पशूधनाचाही या पुरात जीव गेला आहे. रामचंद्र कालेकर यांचे 12 पैकी 10 पशूधन व 40 पैकी…