शेतकऱ्यांची व्यथा घेऊन मनसे जिल्हाधिकारी दालनात

जितेंद्र कोठारी, वणी : वणी व मारेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, अद्याप शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचे नेतृत्वात…

सोनिया गांधींची ईडी चौकशी विरुद्ध काँग्रेस रस्त्यावर

जितेंद्र कोठारी, वणी : नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात सक्तवुसली संचलनालय अर्थात ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलाविले. सोनिया गांधी मंगळवारी सकाळी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल…

बस स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एस.टी. बस स्थानकावर मंगळवारी सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्रवासी बसण्याच्या फलाटावर एक इसम मृत असल्याची सूचना बस स्थानक अधिकाऱ्यांनी सकाळी 7.30 वाजता दरम्यान वणी पोलीस स्टेशनला दिली. सूचनेवरून…

शेतकऱ्याची थट्टा: सन्मान निधी देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाचे हात वर

जितेंद्र कोठारी, वणी: अस्मानी संकटाशी दोन दोन हात करीत असलेल्या शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटांना समोर जावं लागत असल्याचे विदारक दृश्य तालुक्यात पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार पुरस्कृत "पीएम किसान सन्मान निधी" मिळविण्यासाठी थेट मंत्रालयात…

पूर परिस्थितीत सावर्लावासीयांनी केला माणुसकीचा धागा घट्ट

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी झोला व कोना या गावात पूर आला. हे दोन्ही गाव पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावातील सुमारे 900 लोकांना व जवळपास 250 जनावरांना सावर्ला येथे हलविण्यात आले होते. या संपूर्ण चार दिवसांच्या काळात सावर्ला वासीयांनी दिवस…

अतिवृष्टीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने घेतला विषाचा घोट

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या 5 वर्षांपासून होत असलेली सततची नापिकी, कोरडा तसेच ओला दुष्काळाबरोबर येत असलेले अस्मानी संकट, या सर्वांना कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने विषाचा घोट घेऊन आपले आयुष्य संपविले. तालुक्यातील चोपण येथे ही घटना घडली. सुरेश…

सावधान… धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले, गावक-यांना केले स्थानांतरीत

जितेंद्र कोठारी, वणी: अपर वर्धा प्रकल्प मोर्शी. निम्न वर्धा प्रकल्प, धनोडी (आर्वी), बेंबळा प्रकल्प बाभूळगाव या धरणातून वर्धा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे वर्धा नदीची पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे…

संतापजनक – अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी : एकटेपणाचा व गतिमंदत्वाचा फायदा घेत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. सुरेश पोचीराम गडेवार (47) असा…

एस.बी. लॉनजवळ क्रिकेट सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एस.बी. लॉन जवळ एका घरात सुरु क्रिक्रेट सामन्यावर सट्टा खेळताना वणी पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुधीर रमेश चांदेकर (40) रा. शास्त्रीनगर वणी व सलीम जमील शेख (35) रा. भाग्यशाली नगर…

घोन्सा येथील बेपत्ता वृद्धाचा अखेर मृतदेह मिळाला

जितेंद्र कोठारी, वणी : 18 जुलै रोजी कोणालाही न सांगता घरुन बेपत्ता वृद्धाचा अखेर छिन्नभिन्न अवस्थेत मृतदेह मिळाला. वामन जयराम येसेकार (61) रा. घोन्सा असे मृतदेह सापडलेल्या इसमाचा नाव आहे. वणी घोन्सा मार्गावर दहेगाव जवळील विदर्भा नदीच्या…