बहिणीला भेटायला आला आणि गळफास घेऊन जीवन संपविले

जितेंद्र कोठारी, वणी : बहिणीला भेटायला आलेल्या तरुणाने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत वेळाबाई येथे ही घटना गुरुवार 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. बादल त्र्यम्बक मेश्राम (24) रा.…

जाधव सर्जिकल क्लिनिकचे थाटात उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: नागपूर येथील सुप्रसिद्ध सर्जन व मुळचे वणीचे असलेले डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) यांच्या जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी थाटात उद्घाटन झाले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार…

बोरी येथे शेतकरीपुत्राची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: सततची नापिकी आणि नेहमीच पडणारा दुष्काळ या सर्व संकटांना वैतागून एका विवाहित शेतकरीपुत्राने आत्महत्या केली. पुंडलिक मारोती रुयारकर वय 43 रा. बोरी (गदाजी) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. पुंडलिक हा दिनांक…

विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व समाजसेवक विजय चोरडिया यांचा 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम व उपक्रम तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 2 सप्टेंबर…

मोहदा येथे क्रशर प्लांटवर करंट लागून तरुण कामगाराचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: खाणीमध्ये ब्लास्टिंग करणाऱ्या एजन्सीकडे काम करणाऱ्या एका युवकाचा मृत्यू झाला. वणी तालुक्यातील मोहदा (वेळाबाई) येथील विदर्भ प्रोजेक्ट प्रा. लि.च्या क्रशर प्लांटवर ही घटना सोमवार दुपारी 2 वाजता दरम्यान उघडकीस आली.…

पाटाळ्याच्या पुलाच्या कठड्याला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: पाटाळ्याच्या पुलावर असलेल्या एका लोखंडी कठड्याला गळफास घेऊन वणीतील एका तरुणाने आत्महत्या केली. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तेजस विजय मोगरे (20) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव असून तो वणीतील आंबेडकर चौक…

मारेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील शिवणी (धोबे) येथे सकाळी झालेल्या आत्महत्येनंतर आता दुपारी तालुक्यात रामेश्वर येथील एका अविवाहित तरुणाने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. सचिन सुभाष बोढेकर अंदाजे 28 वर्षे, असे आत्महत्या केलेल्या…

मयूर मार्केटिंगमध्ये ‘बाप्पा मोरया’ ऑफरला सुरूवात… खरेदीवर जम्बो डिस्काउंट

जाहिरात प्रतिनिधी, वणीः शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे गणेशोत्सवानिमित्त बाप्पा मोरया ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सुट देण्यात…

रेसर बाईकची पॅशन गाडीला भीषण धडक, एक जागीच ठार

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील करणवाडी फाट्याजवळ आज दुपारी दोन दुचाकांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला आहे. सुधाकर तुकाराम अवताळे (वय अंदाजे 55) असे मृताचे नाव आहे. तर धडक देणारा दुचाकीस्वार अपघात होताच…

मारेगाव तालुक्यात आज पुन्हा आत्महत्या, 5 दिवसात 4 आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील म्हैसदोडका, नरसाळा आणि दांडगाव नंतर आज पुन्हा शिवणी (धोबे) येथे एका शेतक-याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. हरिदास सूर्यभान टोणपे, वय अंदाजे 47 असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. आज मंगळवारी…