वणीमध्ये सेनेची मुहुर्तमेढ करणारे शिंदे गटाला देणार उभारी ?

निकेश जिलठे, वणी: अवघ्या राज्याचं लक्ष लागलेला शिवसेनेचा दसरा मेळावा अखेर मुंबईत पार पडला. यंदा शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट असे दोन स्वतंत्र मेळावे झाल्याने संपूर्ण राज्यात अधिकाधिक लोक घेऊन जाण्याची स्पर्धा सुरू झाली होती. वणी विधानसभा…

चॅम्पियन लीगमधून मिळणार देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू – नितीन भुतडा

विवेक तोटेवार, वणी: चॅम्पियन लीग म्हणजे तळागाळातील खेळाडुंना मिळालेली एक महत्त्वाची संधी असून यातून नक्कीच देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू  तयार होईल, अशी आशा भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी व्यक्त केली. ते T-10 चॅम्पियन लीगच्या…

दीर्घ कालावधीनंतर मारेगाव तालुक्यात पुन्हा आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: काही दिवस खंड पडलेल्या मारेगाव तालुक्यात ऐन सणाच्या दिवशी आत्महत्येची घटना घडली. म्हैसदोडका येथील एका 60 वर्षीय महिलेने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना बुधवारी दिनांक 5 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 1…

ले. कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच शुक्रवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांचे मुळ गाव मुर्धोनी येथील सामुदायीक प्रांगणात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. आज…

मजबूत बांधकामासाठी सिमेंट, सळई व टिनपत्रे ‘जैन बिल्डींग सोल्युशन’मध्ये

बहुगुणी डेस्क, वणी : घर बांधणे हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय आहे. तुमचे घर ही तुमची ओळख असते. म्हणूनच आपल्या घराच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये काय केले पाहिजे हे तुम्हाला माहित असायला हवे. दर्जेदार बांधकाम साहित्य वापर…

नटराज बिल्डींग मॉल मधून खरेदी करा टाइल्स, ग्रॅनाईट, आणि सॅनिटरी वस्तू

बहुगुणी डेस्क, वणी : नवीन घराचे बांधकाम किंवा घराचे नूतनीकरण करत असताना सर्वात जास्त गोंधळ होतो तो म्हणजे टाईल्स आणि सॅनेटरी वस्तूची निवड करताना. मग ते फ्लोर टाइल्स, किचन टाइल्स, वॉल टाइल्स, बाथरुम टाइल्स असो की वॉशबेसिन आणि कमोडची सीट.…

लेफ्टनंट कर्नल वासूदेव आवारी यांचे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना निधन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील टागोर चौकातील स्टेट बँक समोर येथील रहिवाशी असलेले व सध्या आर्मीत लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले वासूदेव दामोदर आवारी (36) यांचे मंगळवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. मंगळवारी…

भरधाव कारची दुचाकीस धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव कारने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तालुक्यातील झोल्या फाट्याजवळ संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शुभम मंगाम असे मृत तरुणाचे नाव आहे. ऐन दस-याच्या पूर्वसंध्येला काळाने…

आजपासून मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) दसरा-नवरात्र ऑफर सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: खास दस-यानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर सोनीच्या साउंडबार…

अट्टल चोरटा लागला वणी पोलिसांच्या हाती

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात गेल्या एक महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरू आहे. अलिकडे चोरट्यांनी आपला मोर्चा दुकान फोडण्याकडे वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर कुख्यात म्हणून ओळख असलेला राजू उर्फ कटर पुरुषोत्तम पोटे (40) हा वणी पोलिसांच्या ताब्यात…