Browsing Tag

Lead Story

राम मुडे यांना पीएचडी

विवेक तोटेवार, वणी: वणीतील राम मुडे यांना नागपूर विद्यापीठाची आचार्य ही पदमी प्राप्त झाली आहे. "आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या जीवन आणि कार्याचे ऐतिहासिक अध्ययन (1899 - 1985)" या विषयावर त्यांनी संशोधन केले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज…

विज कोसळून एका बोकडासह 5 शेळ्या जागीच ठार

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वरूड येथे रविवारी दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान वरुड शिवारात शेळ्या चरत असताना अकस्मात विज कोसळली. यात एका बोकडासह पाच शेळ्या जागीच ठार झाल्या. तालुक्यात सकाळपासूनच उन सावलीचा खेळ सुरु…

45 लाखांचा दरोडा टाकणारे दरोडेखोर अद्यापही मोकाट

जितेंद्र कोठारी, वणी: पोलिसांनी जर मनावर घेतले तर पाताळात जाऊन लपलेल्या गुन्हेगाराला पकडून आणते असे म्हणतात. मात्र वणीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याची घटनेच्या 5 महिन्यानंतरही वणी पोलीस दरोडेखोरांना पकडण्यात अपयशी ठरले आहे. 45 लाख…

अडेगाव ते खडकी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव- खडकी-गणेशपुर या परिसरात मोठ्या खदानी सुरू आहे . खदानीचे वाहतूक खडकी मार्गे अडेगाव या रस्त्याने सुरू आहे. परिसरात जगती मिनरल्स, ईशान मिनरल्स, सूर्या मिनरल्स, गुंडावार…

पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांना निरोप

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांनी बुलढाणा येथे बदली झाली असून त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आला. पोलीस निरीक्षक राठोड दोन वर्षांपासून मुकुटबन ठाण्यात…

वीजेचा धक्का लागून बैलाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: विद्युत खांबाचे टेन्शन वायरमध्ये विजेचा प्रवाह झाल्यामुळे शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कुर्ली शेत शिवारात 28 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. ऐन शेतीच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्याचे…

विष प्राशन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील रामपूर येथील एका अविवाहित तरुणीने शुक्रवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरुणीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज तिची प्राणज्योत मालवली. मृत तरुणी शिवानी…

फुलोरा जंगलात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील रासा येथील एका तरुणाचा घोन्सा परिसरातील फुलोरा (उजाड) या जंगल परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाच्या अंगावर मार लागल्याच्या खुणा…

ट्रॅक्टर चालकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. आज सकाळी बुरांडा (खडकी) येथील एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. मृतकाचे नाव बळीराम कर्णू धुर्वे (37) आहे. बळीराम धुर्वे हा बुरांडा (ख)…

पाटण येथील लाखो रुपयांचा आरओ प्लान्ट दोन वर्षांपासून धुळखात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील आरओप्लान्ट दोन वर्षांपासून बंद असल्याने वॉर्ड क्र. 1 मधील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही ठेकेदार व कंपनी याकडे दुर्लक्ष करीत  आहे. विशेष म्हणजे या आरओ प्लान्टच्या…