Browsing Tag

Lead Story

भेंडाळा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तालुका प्रतिनिधी, झरी: एका विवाहित तरुणाने दस-याच्या दिवशी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुकुटबन येथून पाच कि.मी. अंतरावरील भेंडाळा या गावात ही घटना घडली. गणेश खरवडे (35) असे आत्महत्या करणा-या विवाहित तरुणाचे नाव आहे. त्याने…

मातोश्री ट्रेडर्सची 3 वर्षांची यशस्वी घोडदौड पूर्ण

विवेक तोटेवार, वणी: शहरातील वरोरा रोडवरील लो टी महाविद्यालयाच्या समोर असलेल्या मातोश्री ट्रेडर्सला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहे. अत्यंत वाजवी दरात उत्कृष्ट व दर्जेदार बिल्डिंग मटेरिअल मिळण्यासाठी मातोश्री ट्रेडर्स सुपरिचित आहे. दुकानात…

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज शुक्रवारी आंबेडकरी अनुयायी तसेच शहरातील विविध संघटनांद्वारा अभिवादन करण्यात आले. यावर्षी कोरोनामुळे साध्या पद्धतीने मात्र उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,…

अंगणवाडी सेविका, मदतनीस निवडी ठरली वादळी

भास्कर राऊत, मारेगाव: अंगणवाडी सेविका व मदतनीस निवडीवरून घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. हा गोंधळ इतका वाढला की प्रकरण हातघाईवर आले. दरम्यान परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांची मदत घेण्यात आली. मात्र तरी देखील…

आपट्याच्या फांद्यांवरील फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात

तालुका प्रतिनिधी, वणी: दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची आणि वाटण्याची परंपरा आहे. या दिवशी आपट्याची पूजाही केली जाते. त्यामुळे दस-याच्या काळात फार मोठ्या प्रमाणात बहुगुणी आपट्याच्या झाडाची तोड केली जाते. मात्र नकळतपणे या…

मयूर मार्केटिंगमध्ये दस-यानिमित्त महासेल

सुरेश पाचभाई: खास दस-यानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर सोनी एलईडी टीव्हीवर चक्क…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दसरा धमाका’ ऑफर लॉन्च

सुरेश पाचभाई: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 'दसरा धमाका' ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. सोबतच या वस्तूंसोबत सॅमसंग मोबाईल,…

भरधाव ऑटोसमोर घोडा आडवा आल्याने अपघात

सुरेश पाचभाई, बोटोणी: परिसरात मोकाट घोडा ऑटोला आडवा आल्याने ऑटोचा अपघात झाला. या अपघातात तिघे जखमी झाले, तर घोडा देखील जखमी झाला आहे. बोटोणी परिसरातील गोदाम पोडाजवळ मारेगाव-यवतमाळ राज्य महामार्गावर ही घटना घडली. अपघातात गंभीर जखमींना…

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील वार्ड क्रमांक 8 मध्ये शेजारी शेजारी वास्तव्यास असलेल्या युवकामध्ये 11 ऑक्टोबर रोजी रात्री तुंबळ हाणामारी झाली होती. यात एक युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला यवतमाळ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु…

शहरात भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आधीच कोरोनाच्या संकटाने व त्यात लागलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता कुठे तरी परिस्थिती हळूहळू सावरला लागली असताना महागाईने डोके वर काढायला सुरवात केली आहे. पेट्रोल,…