Browsing Tag

Lead Story

हृदयद्रावक: 8 व्या माळ्यावरील गॅलरीतून कोसळून वृद्धाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: पहाटे उठल्यानंतर फ्लॅटच्या गॅलरीत फिरण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा गॅलरीतून कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. शहरातील शेवाळकर परिसरात हा अपघात झाला. प्रभाकर गोविंदराव पाथ्रडकर…

मुकूटबन येथे महावीर जयंती जल्लोषात साजरी

जितेंद्र कोठारी, वणी: सकल जैन समाजाच्या वतीने मुकुटबन येथे गुरुवार 14 एप्रिल रोजी भगवान  महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जैन स्थानकापासून काढण्यात आलेल्या शोभायात्रेने संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष वेधले. अहिंसा परमो धर्म, महावीर…

लोडशेडिंग थांबविण्याची क्रांति संघटनेची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात बुधवार 13 एप्रिल पासून शहरी व ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेले वीज भारनियमन तात्काळ थांबविण्यात यावे. अशी मागणी क्रांति संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी उप विभागीय अधिकारी वणी मार्फत…

दोन वर्षानंतर वणीत रामनवमी शोभायात्रेचा जल्लोष

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा रामनवमीची शोभायात्रा जल्लोषात शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाली. ढोल ताशा, भजनी मंडळाचा गजर यात हर्षोल्हासात निघालेल्या या शोभायात्रेत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.…

आज रामनवमी निमित्त शहरात निघणार भव्य शोभायात्रा

जितेंद्र कोठारी, वणी: प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीनं रामनवमीनिमित्त आज रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी वणी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी च्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी रामनवमी…

वाहतूक विभागाची शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील रस्त्यांवर वाढत्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी शुक्रवार 8 एप्रिल पासून अतिक्रमण हटाव मोहीम उघडली आहे. वाहतूक पोलीस उप शाखेचे सपोनि संजय आत्राम…

वणी येथील दाम्पत्याला लुटणाऱ्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद

जितेंद्र कोठारी, वणी:  खिळ्याचा लाकडी पट्टा रस्त्यावर टाकून चारचाकी वाहनांना लुटणारी दरोडेखोरांची टोळीला वर्धा पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथून अटक केली आहे.  याच टोळीने 7 एप्रिल रोजी रात्री 2 वाजता दरम्यान नागपूर चंद्रपूर…

यवतमाळ रोडवरील नंदिनी बारमध्ये चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ मार्गावरील नंदिनी बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता दरम्यान उघडकीस आली. पहाटे 3.30 वाजता सुमारास शटरचा कुलूप तोडून चोरट्यानी बारमध्ये प्रवेश केला आणि ड्रॉवरमधील 18 हजार…

कोळसा भरलेले ट्रक दोन दिवसांपासून वणी पोलीस ठाण्याच्या आवारात

जितेंद्र कोठारी, वणी: घुग्गुस येथील गुप्ता कोलवॉशरी मधून उमरेड येथील महाजेन्को कंपनीसाठी कोळसा घेऊन जाणारे दोन ट्रक बुधवार 6 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता वणी पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरीचा कोळसा असल्याच्या संशयावरून रात्री गस्तीवरील पोलीस…