वरोरा रोडवरील बारसमोर राडा

विवेक तोटेवार, वणी: वणीतील वरोरा रोडवरील एका बारसमोर राडा झाला. त्यात एका व्यक्तीच्या डोक्यावर दारूची बाटली फोडण्यात आली. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत जखमीच्या वडिलांद्वारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली…

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा ८०० वा अवतारदिन गुरुवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: ‘कुमरू जियाला, कुमरू जियाला’ या चर्चेने सर्वत्र आनंदाचे वातारवण झाले. भडोचचे राजकुमार हरपाळदेव पुन्हा जिवंत झाले होते. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध द्वितियेचा. हे हरपाळदेव पुढे गुजराथहून तीर्थयात्रेच्या…

विष प्राशन करून महिलेची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव : एका विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथे दुपारी दोनच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. वंदना गजानन धनवे (50) असे विष घेऊन…

कोरोनाची आता ट्रॅफिक विभागात एन्ट्री

जब्बारी चीनी, वणी: आज रजा नगर येथील 1 शास्त्री नगर येथे 2 तर शिंदोला येथील 1 व्यक्ती तर ट्रॅफिक विभागातील एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉजटिव्ह आढळून आली आहे. तालुक्यातील कोरोनाची जवळपास सर्व साखळी खंडीत होत असतानाच नवीन रुग्ण आढळून साखळी वाढत…

अखेर नरसाळ्यातील दोन अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी पकडून दिले

नागेश रायपुरे, मारेगाव: तान्ह्यापोळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नरसाळा येथे आज दोन अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी पकडून पोलिसात दिले. मारेगाव पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून देशी दारूच्या बाटल्यांसह मुद्देमाल जप्त…

फक्त दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तान्हा पोळा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: यु़द्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय, उद्योगात लागली होती. 1806च्या काळात रघुजी राजे भोसले द्वितीय हे काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीत लागले होते.…

मृतकाच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत न दिल्याचा आरोप

विवेक तोटेवार, वणी: कायरजवळील नवरगाव येथील शेतशिवारात विजेच्या तारेच्या धक्क्याने विलास मोहूर्ले या सालगड्याचा मृत्यू झाला होता. वडिलांचा शेतात मृत्यू झाल्याने शेतमालकाने मदत करावी अशी मागणी मृतकाचा मुलगा ईश्वर मोहूर्ले याने केली आहे. घरची…

चोरट्यांनी चोरली कार…. पण डाव फसला

विवेक तोटेवार, वणी: अज्ञान चोरट्यांनी कार तर चोरली मात्र नेताना ती मध्येच पंक्चर झाल्याने चोरट्यांचा चोरीचा डाव फसला. वणी शहरातील विठ्ठलवाडी येथील ही घटना आहे. सोमवारी रात्री ही कार पोलिसांनी जप्त केली. शहरातील विठ्ठलवाडी येथे अमर विठ्ठल…

पोळ्याचा ‘बैलपोळा’ कशाला करता?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘बैलपोळा’ हा शब्द अलीकडच्या काळात विदर्भातही सर्रास वापरला जातोय. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि पत्रकार असलेले श्रीवल्लभ सरमोकदम यांनी हा विचार धरून लावला. पोळा बैलांचाच असतो. तो इतर प्राण्यांचा असल्यास तसं कुणी…

कोरोना पसरवतोय पोलीस विभागात हातपाय…

जब्बार चीनी, वणी: कोरोनाने आता अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणा-या विभागात हातपाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. आज वणीत पोलीस विभागातील 1 व गृहरक्षक दलातील 1 असे दोन कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहे. यासह शास्त्रीनगर येथील रुग्णाच्या संपर्कात…