चार दिवसांत 470 लोकांची जाग्यावरच कोरोना टेस्ट

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मार्डी चौक परिसरात प्रशासनाकडून नाका बंदी लावण्यात आली. या नाकाबंदीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जाग्यावरच कोरोना तपासणी केली जात आहे. त्यात चक्क 4 दिवसात 470 लोकांची तपासणी केली असता…

डॉक्टर मुलाच्या मृत्यूनंतर वडीलांचेही कोरोनाने निधन

जितेंद्र कोठारी, वणी: चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर डॉ. प्रशांत लक्ष्मणराव चांदेकर (35) यांचे 30 एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर सोमवार 10 मे रोजी त्यांचे वडील लक्ष्मणराव चांदेकर यांचेही निधन…

शिवसेनेच्या रूपात माणूसकी आली धावून….

जितेंद्र कोठारी, वणी: सगळेच जण कोरोनाच्या धास्तीत आहेत. एक प्रकारची अनामिक असाहयता निर्माण झाली आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मदत करण्याची इच्छा असतानाही सामान्य नागरिक कोरोनाग्रस्तांना विशेष मदत करू शकत…

शुल्लक कारणावरून वाद, एकमेकांवर लोखंडी सळई व विटेने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: शहरातील पंचशील नगर येथे राहणाऱ्या दोन शेजाऱ्यात आज मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान जागेच्या कारणावरून भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की त्यांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि विटने हल्ला केला. या भांडणात दोघे जखमी…

माजी आमदार पुट्टा मधू यांना आंध्रप्रदेश येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वकील दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी शनिवारी पेद्दापल्ली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) चे माजी आमदार पुट्टा मधुकर यांना अटक केली. विशेष पोलिस पथकाने पुट्टा मधू यांना शनिवारी…

गरजू रुग्णांना घरपोच ऑक्सीजनची सेवा:

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरातील दवाखान्यात अनेक रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. अशातच युवा सेनेने ज्या गरीब रुग्णांना ऑक्सीजन मिळत नाही…

स्माईल फाउंडेशन तर्फे वणी येथे रक्तदान शिबिर

जब्बार चीनी, वणी: स्माईल फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीरात 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्तदान शिबिर टागोर चौकाजवळील श्री विठ्ठल रुक्मिणी सभागृहामधे झाले. याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय…

मारेगाव तालुक्यात आज 36 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 11 मे रोजी तालुक्यात 36 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर नवरगाव येथील एका 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज 5 व्यक्तींनी कोरोनावर मात करीत बरे होवून घरी…

दिलासादायक: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 11 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे 70 रुग्ण आढळलेत तर 113 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 28 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 40 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 2 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे.…

पुरड (पुनवट) जवळ दुचाकीचा भीषण अपघात

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी ते घुगूस मार्गावर पुरड (पुनवट) जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सोमवारी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान उपारासाठी दाखल करताना दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.…