बोरी ते पाटण मार्गावरील पुलाचे काम अर्धवट

पाटण: बोरी-पाटण-मुकुटबन रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. यामध्ये सर्वप्रथम छोटे छोटे पुल बांधणीचे काम हाती घेण्यात आले. मात्र यातील अर्धे काम थंडबस्त्यात आहे. जिथे काम झाले तिथे मातीचा ढिगारा पसरवण्यात आला आहे. या डिगाऱ्यामुळे…

सोयाबीनच्या बियाणांचे भाव वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल

पाटण: पेरणीचे दिवस जवळ आले आहे. शेतक-यांची आता पूर्वमशागत सुरू आहे. दरम्यान आता बि बियाणांची खरेदी देखील सुरू झाली आहे. मात्र सोयाबिनच्या 25 किलोच्या बियांणांच्या बॅगमागे सुमारे 1000 ते 1500 रुपयांची वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे शेतक-यांचे…

एलसीबी पथक येणार असल्याची माहिती कुणी दिली?

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुकुटबन, अडेगाव, खातेरा, गणेशपूर, डोंगरगाव, तेजापूर, बोपापूर या गावांत अनेकजण खुलेआम अवैध दारूविक्री करीत आहे. तर खातेरा ,कोठोडा, गडेघाट व परसोडा घाटावरून दररोज 100 ते 200…

शिरपूर परिसरात वीजेचा लपंडाव सुरूच

विवेक पिदूरकर, शिरपूर: गत काही दिवसांपासून शिरपूर व परिसरात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीने मनमानी कारभारात सुधारणा करावी. अशी मागणी नागरिकांन कडून होत आहे . दिवसभरात केव्हाही वीजपुरवठा खंडित…

मारेगावात उद्या रक्तदान शिबीर

नागेश रायपुरे, मारेगाव: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना रक्ताची गरज केव्हा पडेल हे सांगता येत नाही. त्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेड मारेगाव शाखेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्या दिनांक 14 में…

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुका कोरोना विषाणूच्या ग्रहणात असताना तालुक्यात आत्महत्यांचे सत्रसुद्धा थांबता थाबेना. पुन्हा एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील कान्हाळगावं(वाई) येथे घडली. दिलीप रामराव…

गांधी चौकातील राधिका साडी सेंटरला ठोकले सील

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना संसर्ग संबंधी शासनाने लागू केलेले नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गांधी चौकातील राधिका साडी सेंटरला नगर पालिका पथकाने मंगळवार 12 मे रोजी सील ठोकले. तसेच दंड भरण्यास नकार दिल्याने राधिका साडी सेंटरचे संचालका विरुद्ध…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा..

नागेश रायपुरे, मारेगाव:आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 12 में रोजी तालुक्यात केवळ 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तालुक्यात रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे आज 42 रुग्णांनी कोरोनावर मात करीत बरे…

100 रुपयांत दुरुस्त होऊ शकतो कोरोनाचा रुग्ण !

सुशील ओझा,झरी: तालुक्यात दररोज कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण वाढत आहे. कोरोना टेस्ट केल्यावर मुद्दाम पॉजिटिव्ह दाखवून लोकांना दवाखान्यात भरती करून पैसे उकळले जात असल्याची चर्चा आहे. तसेच भरती करण्यात आलेले रुग्ण घरी परत येत नाही. अशा अफवा, विविध…

आज तालुक्यात 64 पॉझिटिव्ह तर 97 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 64 रुग्ण आढळलेत तर 97 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 27 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 29 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 8 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. सध्या तालुक्यात 760…