जीवन ढेंगळे यांचे नागपूरमध्ये निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुळेच वणी येथील रहिवाशी असलेले जीवन वसंतराव ढेंगळे (33) यांचे नागपूर येथे हृदयविकाराच्या धक्काने निधन झाले. ते वणीतील जैन लेआऊट येथील रहिवाशी होते व नोकरीनिमित्त नागपूर येथे स्थायिक होते. त्यांच्या निधनाने परिसरात…

बाहेर राज्यातून आलेले १७९ लोक होम कॉरेन्टाईन

सुशील ओझा, झरी: तालुक्यात लॉकडाऊन दरम्यान ७५५ विद्यार्थी कर्मचारी व इतर लोक आपल्या घरी परतले सर्वांची आरोग्य तपासणी करून कोरोन टाईम करण्यात आले होते. त्यापैकी ६६२ जण १५ दिवस कोरोनटाईम राहून मुक्त झाले आहे तर १२९ जण आजही शाळेत व घरी कोरोन…

मुकुटबन येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू

सुशील ओझा, झरी: शासनाने बहुप्रतीक्षेनंतर सीसीआयची कापूस खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 4 मे रोजी सकाळ 7 वाजेपासून मुकूटबन येथे ऑनलाइन नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदीची सुरुवात करण्यात आली. सचिव…

उपचारासाठी गेलेल्या महिलेच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या पाश्वभूमिवर एक संतापजनक घटना वणीत घडली आहे. एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना वणीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांनी प्रकृती बघुन तात्काळ पुढच्या उपचारासाठी चंद्रपूरला…

शिबला येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिबला येथे दोन ठिकाणी पाटण पोलिसांनी छापा मारून एक मारुती 800 क्रमांक याच्यासह 53 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पाटण पोलीस स्टेशन…

वणीतील वारंगणा वस्तीतील रहिवाशांवर उपासमारीची वेळ

विवेक तोटेवार, वणी: वणीतील रेड लाईट एरिया म्हणून परिचित असलेल्या प्रेमनगरमध्ये वारांगना आपली देहविक्री करून पोटाची खळगी भरतात. सध्या कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या बिकट समयी कुणीही…

“भाऊ, कधी सुरू होणार?” तळीरामांचा आर्त सवाल

जब्बार चीनी, वणी:  रेडझोन मध्येही मद्यविक्रीला सशर्त परवानगी मिळाल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून येत आहे. त्यामुळे मद्यशौकिनांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. सध्या सोशल मीडियातून 'तिन्ही झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी' अशा आषयाच्या…

वर्धा नदीवरील कालबाह्य पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू

जब्बार चीनी, वणी: यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणा-या वर्धा नदीवरील धानोरा पुलाचे एकशे चार बेरिंग बदलविण्या बरोबरच मायक्रोकाँक्रेटींग च्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे येणा-या पावसाळयात वणीकरांना आता घुग्गुस मार्गे चंद्रपुर,…

मॅकरून स्कूलतर्फे चतुर्थ कर्मचा-यांना धान्य किटचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील मॅकरून स्कूल तर्फे शाळेतील तसेच बाहेरील 100 चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्गाला धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. शनिवारी मॅकरून स्कूलचे संचालक पीएस आंबटकर यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या मुख्याध्यापिका शोभन…

राजूरमध्ये 250 लोकांना मास्क वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाने वारंवार हात धुण्याचे व तोंडावर मास्क लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गावातील लोकांना राजूर येथील न्यू प्रतिभा कोचिंग क्लासेसतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले. गावातील 250…