सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिका-यांना धरले धारेवर….

विवेक तोटेवार, वणी: कोरोना संदर्भात बाहेरून येणा-यांची योग्य ती तपासणी होत नसल्याच्या मुद्दयावरून झालेल्या बैठकीत शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या…

नायगाव (बु) ग्रामपंचायततर्फे 51,470 रुपयांची मदत

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नायगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे कोरोना आपत्ती निवारणासाठी 51, 470 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधिला देण्यात आला. हा सर्व निधी ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून उभा केला आहे. जमा झालेल्या निधीचा चेक…

बम्बईसे आया मेरा दोस्त, ‘दुरसे’ सलाम करो….

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून वणी व परिसरात मुंबई, पुणे, औरंगाबाद इत्यादी शहरातून मोठ्या प्रमाणात लोकांचे आगमन सुरू आहे. यात विद्यार्थी, तसेच नोकरीनिमित्त असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. तर मुंबई हॉटस्पॉट ठरल्याने काहींनी…

कामगारांची राहण्याची व्यवस्था कंपनीत करावी

सुशील ओझा, झरी: मुकूटबन येथे आरसीसीपीएल कंपनीचे सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू असून फॅक्टरीत बाहेर राज्यातील कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊन मुळे फॅक्टरी एक ते दीड महिना बंद होती परंतु काही दिवसांपासून फॅक्टरी उभारण्याचे काम…

विजय पिदूरकर यांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

तालुका प्रतिनिधी, वणी: माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे नेते विजय आनंदराव पिदूरकर यांनी कोविड - १९ या जागतिक आपत्तीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. पुतण्या पंकज संजय पिदूरकर…

सीसीआयच्या कापूस खरेदीतही उत्तम कापसाला योग्य भाव नाही

जब्बार चीनी, वणी: सीसीआयकडे विक्रीसाठी जो कापूस येत आहे. त्यात शेतक-यांनी भाववाढीच्या अपेक्षेने घरात साठवून ठेवलेला पहिल्या दोन वेचणीचा कापूस आहे. हा कापूस उत्तम प्रतीचा कापूस असतो. हा कापूस शेतक-यांनी फेब्रुवारी 2020 अखेरपर्यंत विकला असता…

वारंवार त्रास दिल्यानेच संतापाच्या भरात खुलासा – खैरे

जितेंद्र कोठारी, वणी: मला वारंवार शो कॉज नोटीस देऊन त्रास दिला जात असल्यानेच संतापाच्या भरात असे पत्र लिहिले असल्याचा खुलासा बाळासाहेब उर्फ अरुणकुमार खैरे यांनी केला आहे. त्यांनी वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीसला दिलेले अजब उत्तर सध्या सोशल…

कॉरेन्टाईन असलेल्या तरुणाची आत्महत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील जि. प. शाळेत होम कॉरेन्टाईन असलेल्या तेवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तो अहमदनगर येथे कामाला होता. गेल्या आठवड्यात तो अहमदनगरहून…

वणीत आजपासून तांदळासोबत मोफत डाळ वाटप

जब्बार चीनी, वणी: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत गहू व तांदूळापाठोपाठ आता डाळही मोफत देण्यात येणार आहे. शनिवार पासन या वाटपाला सुरूवात होणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब…

आर्थिक व्यवहार करून कापसाच्या गाड्या खाली होत असल्याचा आरोप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील सीसीआयच्या कापूस खरेदीत मोठा घोळ होत असून गरीब शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाडया न घेता दलालांच्या कापसाच्या गाड्या घेऊन भेदभाव केल्या जात आहे, असा गंभीर आरोप खुद्द बाजार समितीचे संचालक सुनिल ढाले यांनी…