मारेगावात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात

नागेश रायपुरे, मारेगाव: मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आयोजित सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ जयंती स्थानिक जिजाऊ चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४९८ वी जयंती…

सिंदी येथे विष प्राशन करुन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील सिंदी येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ता.१० जानेवारीला घडली. मागील वर्षात आत्महत्यांची मालिका सुरु असताना ती खंडित न होता नवीन वर्षात पुन्हा आत्महत्यांची मालीका…

जळका येथे शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील जळका येथील शेतकरी बाळू उर्फ हेमंत जानराव मोघे (55) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि यावर्षी सोयाबीन व कापूस पिकाचा बसलेला फटका या धक्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हेमंतकडे स्वत:च्या नावाची…

….आणि वणी ते भद्रावती अंतर राहील फक्त 16 किलोमीटर

जितेंद्र कोठारी, वणी : वणी निळापूर ब्राह्मणी मार्गावर जुनाडा गावालगत वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम युद्ध स्तरावर सुरु आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर वणी ते भद्रावतीचे अंतर फक्त 16 किमी राहणार आहे. या नव्या शॉर्टकटने जवळपास अर्धे अंतर कमी…

एका ‘चमत्काराने’ ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा टॅक्स जमा

सुशील ओझा, झरी: अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनेक वर्षांपासून टॅक्स न भरलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावात चपराशी दहा चकरा मारून सुद्धा टॅक्स वसूल होत नाही; परंतु निवडणूक लागताच बहुतांश टॅक्स वसूल होतो हे निश्चित. हादेखील एक मोठा…

झरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा चढला ज्वर

सुशील ओझा,झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्यांचे १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी याकरिता सर्वच पक्षांतील गावपुढारी कामाला लागलेत. प्रचार जोमात सुरू झाला आहे.…

आज तालुक्यात 6 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी:  सोमवारी दिनांक 11 जानेवारी रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 06 रुग्ण आढळलेत. यातील 3 रुग्ण हे वणी शहरात तर 3 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील इंदिरा चौक 2, पोलिस काॅलनी 1, राजूर काॅलरी 2, कुंभारखनी वसाहत 1 असे रुग्ण आहेत.…

क्रिकेट सट्टा धाड: फिंगरप्रिंट लॉक असलेल्या तळघरात चालायचा सट्टा

जब्बार चीनी, वणी: रविवारी यवतमाळ येथील चमुने वणीतील वरोरा रोड वरील गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात असणाऱ्या एका बिल्डरच्या फ्लॅटवर धाड टाकली. या धाडीत शहरातील एका बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुपारी 4 ते साडे…

एस.टी. बस मधून महिलेचे दागिने व रोख लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : वणी येथून आपल्या गावाकडे एस. टी. बसने निघालेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने सोन्याची पोत व रोख 1200 रुपये लंपास केले. दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता घडलेल्या घटनेबाबत पीडितेने वणी पो.स्टे. येथे तक्रार…

गळफास लावून युवकाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव ग्रामपंचायत अंतर्गत मेघदूत कॉलोनीमध्ये विवाहित युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवार 10 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता उघडकीस आली. दिनेश शंकर डोहे (32) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.…