आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 4 तर ग्रामीण भागात 4 रुग्ण आढळून आलेत. वणी शहरात रविनगर येथे 2, सुराणा ले आऊट व नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. तर…

डॉ. पद्माकर मत्ते हल्ला प्रकरणी 4 आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: डॉ. पद्माकर मत्ते हल्ला प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 1 ते दीड तासांमध्ये आरोपींना भालर टाऊनशीप येथून अटक केली. आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान धारदार शस्त्रााने त्यांच्यावर निघृण हल्ला करण्यात आला होता. यात ते गंभीर जखमी झाले…

मुकुटबन येथे पाणी टंचाईमुळे ग्रामवासी त्रस्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी १५ सदस्यीय ग्रामपंचायत असून १२ हजार लोकसंख्या असलेले गाव म्हणून मुकुटबन गावाची ओळख आहे. मुकुटबन येथे ५ वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डात तीन सदस्य निवडून आले आहे. दोन महिन्यापूर्वी नवीन बॉडी विराजमान झाली…

विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील जनतेत रोष

सुशील ओझा, झरी: उन्हाळा सुरू होताच जनतेला  उन्हाची गर्मी व चटके जाणवायला सुरवात झाली आहे. उन्हाच्या गर्मी सुरू असतानाच लाईन जाणे व त्यात डबल गर्मी जाणवणे लोकांच्या जीवावर उठले आहे. तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून विजेच्या लपंडवाने तसेच कमी…

रविवारी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 4 एप्रिल रोजी तालुक्यात 6 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 3 तर ग्रामीण भागातील 3 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील तेली फैल येथे 2, स्वामी समर्थ नगर येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. तर…

खळबळजनक: डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुपरिचित डॉक्टर डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने दोन इसमांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सध्या त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात…

पत्रकारांना कोरोना लसीकरणासाठी होणार स्वतंत्र शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळात आपले जीव धोक्यात टाकून पत्रकारिता करणाऱ्या 45 वर्षावरील पत्रकारांना कोविड योद्धा प्रमाणे प्रामुख्याने कोरोना लसीकरण करण्यात यावे याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करावे, अशा प्रकारची अधिसूचना शनिवार 4 एप्रिल…

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीची बैठक

जितेंद्र कोठारी, वणी: येत्या काही दिवसात वणी नगर परिषद तसेच नगर पंचायत निवडणुक कार्यक्रम घोषित होणार आहे. या निवडणुकीत वणी विधानसभेत असलेल्या नगर परिषदेवर व नगर पंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी आपली…

कोरोना रुग्णसंख्येने तोडले सर्व रेकॉर्ड, आज 65 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 3 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज तालुक्यात तब्बल 48 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 12 तर ग्रामीण भागातील 34 रुग्णांचा समावेश आहे. तर झरी आणि पांढरकवडा…

वणी न.प. अधिका-याला 25 हजारांचा दंड, माहिती देण्यास टाळाटाळ करणे भोवले

जितेंद्र कोठारी, वणी: माहितीचा अधिकाराचा वापर करुन मागितलेली माहिती 30 दिवसांच्या आत न दिल्यामुळे वणी नगर परिषद येथील जनमाहिती अधिकाऱ्यास (तत्कालिन नगर अभियंता) 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांविरुद्द…