लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची अविरोध निवड

जितेंद्र कोठारी, वणी : प्रतिष्ठित सामाजिक संस्था लायन्स क्लबची निवडणूक नुकतेच शनिवार 24 जून रोजी पार पडली. देशमुखवाडी स्थित लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल सभागृहात पार पडलेल्या या निवडणुकीत लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष पदावर आमदार…

सरकारी दवाखान्या समोरील रस्त्यावर पाण्याचे तळे, रुग्णांची होतेय गैरसोय

जितेंद्र कोठारी, वणी : येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय समोर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. रुग्णालयाकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्यावर पाण्याचे डबके साचल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाची तसेच नातेवाईकांची गैरसोय होत आहे.…

अपघातानंतरही मेंटेनन्सच्या कामाकडे महावितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

जितेंद्र कोठारी, वणी : पावसाळ्याचे आगमन होऊनही विद्युत विभागाचे मेंटेनन्सच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाठी गावातील पियूष माहुरे या बालकाला करंट लागून…

केशव नागरी पतसंस्थेच्या सदस्य पदावर प्रा. खाडे कायम

विवेक तोटेवार, वणी : येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे सदस्य प्रा. महादेव खाडे यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय विभागीय सह निबंधक (सहकारी संस्था) अमरावती यांनी दिला आहे. जिल्हा उप निबंधक, यवतमाळ यांच्या आदेशाविरुद्ध प्रा. खाडे यांनी…

वणी ठाणेदारपदी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची नियुक्ती

जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांची अकोला येथे बदली झाल्याने वणी पोलीस स्टेशनचे नवीन शिलेदार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक अजित जाधव…

डॉ. रोहित वनकर यांची अमरावती विद्यापीठ मंडळावर निवड

जितेंद्र कोठारी, वणी : येथील नुरजंहा बेगम सलाट आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचे डॉ. रोहित वनकर यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे समाजशास्त्र अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. रोहित वनकर यांची…

मारेगावच्या चौघांचा चंद्रपूरजवळ अपघाती मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: राजूरा येथून साक्षगंध सोहळा आटोपून मारेगावला परतताना पडोलीजवळ गाडीचा अपघात होऊन अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. आज दि. 23 जूनला दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एकाच वेळी दोन कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण मारेगाव…

महाऑनलाईनचे सर्वर डाऊन, विद्यार्थी व पालकांना मनस्ताप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या दोन तीन दिवसांपासून महाऑनलाई सर्वर डाऊन येत असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले तात्काळ मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय सर्वर…

अंधारात संशयास्पदरित्या हालचाली करताना दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी :शहरातील मुख्य रस्त्यावर मध्यरात्रीनंतर संशयास्पद हालचाली करताना दोघांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश बंडू सोयाम व राहुल शंकर नक्षिणे दोन्ही रा. कनकवाडी, वणी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने…

मोठ्या भावाची लहान भावाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी

जितेंद्र कोठारी, वणी: दुकानाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला चाकू दाखवून धमकावले व जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी संध्याकाळी वरोरा रोड येथे ही घटना घडली. या प्रकरणी आईने मोठ्या मुलाविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.…