वणी पोलिसांनी केली स्वच्छता मोहिमेला सुरुवात

विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित

0 626

वणी (रवि ढुमणे): वणी शहरात पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी सकाळी साडेसात वाजता स्वच्छता  मोहीम राबविण्यात आली होती. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

जिकडे तिकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.  वणी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी पुढाकार घेत. रविवारी सकाळी गांधी चौकातून रस्ते स्वच्छ करण्याची मोहीम उभारली होती.

या मोहिमेत वणी ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  प्रसंगी या मोहिमेत असलेल्या सर्वांना पांढरे टी शर्ट देण्यात आले होते.  सोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला पत्रकार , तसेच पदाधिकारी उपस्थित होते.  वणी पोलिसांनी स्वच्छता मोहीम राबवून एक नवीन संदेश दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.