Browsing Tag

Lead Story

संचारबंदीत सेवा देणा-या कर्मचा-यांना ‘अरेनिकम’चे ड्रॉप्स

निकेश जिलठे, वणी: भर दिवसा रस्ते सुनसान झालेले... जो मुख्य चौकही मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो तो ही भर दुपारी निर्मनुष्य.... रस्त्यावर केवळ मास्क बांधून आणि हातात काठी घेऊन पोलिसांचा वावर... अशाच एका वेळी एका मुख्य चौकात डॉक्टर पोहोचतात आणि…

धक्कादायक… पुण्याहून वणीत आलेल्या अनेकांनी टाळली तपासणी !

जब्बार चीनी, वणी: सध्या संपूर्ण राज्य कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून बाहेरगावाहून येणा-या लोकांनी सर्वात आधी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करून पुण्याहून व…

शाब्बाश… ‘या’ गावाने स्वतःला केले क्वारंटाईन !

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागात संचारवंदी लागू करावी लागली . रस्ते निर्मनुष्य करण्यासाठी जागोजोगी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे . मात्र यातही काही सुखद बातम्या कानी पडत आहेत . भालर या गावातील ग्रामस्थांनी एकत्र…

अवैध दारूविक्री करणाऱ्या 4 जणांना अटक

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण राज्यात संचारबंदी असताना तसेच बार व वाईनशॉप बंदचे आदेश दिले असताना ही परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री सुरू आहे. आज बुधवारी वाघदरा येथे दारूची छुप्या रितीने अवैध विक्री करताना चार जणांना वणी पोलिसांनी…

संचारबंदी मजूर वर्गावर उपासमारीची वेळ

सुशील ओझा, झरी: देशासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची दहशत पसरली आहे.जनतेला कोरोना विषाणूची लागण होऊ नये याकरीता सरकारने जिल्हाबंदी तसेच जमावबंदी व संचारबंदी लागू केल्याने रोजमजुरी हमाली करणाऱ्या लोकांचे हाल होत असल्याचे चित्र पहायला मिळत…

रेशनकार्ड धारकांना मिळणार 3 महिन्यांचे धान्य 

जब्बार चीनी, वणी: वणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या सर्व मार्केट, व्यवसाय, उद्योग बंद आहे. त्यामुळे गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील 33 हजार…

वणीत फक्त ‘इथेच’ मिळणार भाजी आणि फळं

निकेश जिलठे, वणी: भाजी मंडई बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी आता केवळ मोजक्या चौकातील काही किरकोर भाजी व फळ विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. उद्या बुधवारपासून हा निर्णय लागू राहणार आहे. मुख्याधिकारींनी…

कोरोनाचा बाजार; संचारबंदीचा भाजीपाला

संपादकीय -  आज महाराष्ट्रातील काही भाजीमंडईचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. लोकांची त्या ठिकाणी अक्षरश: जत्रा भरलेली होती. लोक संचारबंदीला सहकार्य करीत आहे. मात्र मंडईतील गर्दी बघितले की ही संचारबंदी पालथ्या घागरीवर पाणी असल्याचे दिसून…

दुर्भा गावातील नागरिकांनी केले गावबंदी

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील शेकडो तरुण तरुणी कोरोना बाधित शहरातून तालुक्यातील अनेक गावात परतत आहे. कोरोनाची लागण दुर्भा गावातील जनतेला होऊ नये याची खबरदारी घेत दुर्भा (नवीन) येथे २४ मार्च रोजी मंगळवारी कोरोनाच्या संसर्गाच्या बचावासाठी…

संचारबंदीमुळे बँक सेवेवर मर्यादा

विवेक तोटेवार, वणी: दररोज करोना संसर्गाचा वाढत अससेला प्रादुर्भाव बघता राज्यभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवांसह बँकिंग सेवाही सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, बँकेत होणारी गर्दी…