Browsing Tag

Lead Story

मेंढोली येथे लिम्पी रोगाबाबत मार्गदर्शन व लसीकरण शिबिर

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज गुरुवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी मेंढोली येथे लिम्पी त्वचा रोगाबाबत मार्गदर्शन व लसीकरण शिबिर घेण्यात आले. हे शिबिर पशुवैद्यकीय दवाखाना शिरपूर अंतर्गत डॉ. धीरज अनिल सोनटक्के व पशुधन विकास अधिकारी शिरपूर यांच्या…

आनंदराव घूलाराम थेटे यांचे निधन

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक सानेगुरुजी नगर येथील आनंदराव घूलाराम थेटे (85) यांचे यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये आजाराने निधन झाले. शिवसेनेचे शाखाप्रमुख जनार्दन थेटे यांचे ते वडील होते. विवेकानंद हायस्कूलचे आनंदराव संचालक होते. मृदूभाषी…

उमरेडचे बहुगुणी शिंगाडे आलेत वणीत

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः शहरात ठिकठिकाणी उमरेडचे बहुगुणी शिंगाडे विक्रीसाठी आलेत. तसे पाहता वणी आणि मुकुटबनचे शिंगाडे परिसरात फेमस आहेत. वणीतला मोठा तलाव हा शिंगाडा तलाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. तरीदेखील गाळामुळे तिथलं शिंगाडा उत्पादन सध्या…

पिंपळगाव येथे झाले रक्तदान शिबिर

जब्बार चिनी, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताची कमतरता लक्षात घेता राष्ट्रहिताच्या दृष्टीने मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळ पिंपळगाव व दीपक मत्ते मित्रपरिवार तर्फे दिनांक 2 सप्टेंबर रोज सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शासकीय रक्तपेढी…

आय. व्ही. आर. सी. एल. टोलवेज कंपनीला भरावा लागणार नगर परिषदेचा कर

विवेक तोटेवार, वणी: आय. व्ही. आर. सी. एल. टोलवेज कंपनी करंजी वणी व घुग्गुस चंद्रपूर रोडवर पथकर वसुलीचे काम करते. या ठिकाणी कंपनीने कोणतेही कागदपत्रे किंवा नगर परिषदेची परवानगी न घेता बांधकाम करून कार्यालय बांधले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून…

मराठा सेवा संघाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

सुशील ओझा, झरी: मराठा सेवा संघाच्या ३० व्या वर्धापनदिनाला वृक्षारोपण झाले. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद झरी तालुक्याच्या वतीने तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे " हा…

गटशिक्षणाधिकारीम्हणून प्रकाश नगराळे यांची बढती

सुशील ओझा, झरी: पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे यांना प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून बढती देण्यात आली. प्रभार स्वीकारून ते शिक्षण विभागात रुजू झालेत. त्याआधी वणी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केले. विविध…

मेंढोली येथे गरोदर मातेचा अकस्मात मृत्यू

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील मेंढोली येथे एका गरोदर मातेचा अकस्मात मृत्यू झाला. दि.1 मंगळवारी सकाळी ही दुःखदायक घटना घडली. सदर महिलेच्या अकस्मात मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार मीना विवेक मेश्राम (23) असे मृत…

कोसारा येथे विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा येथील शेत शिवारात एका 22 वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धम्मदीप दिवाकर वनकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.…

विठ्ठलवाडीत गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील विठ्ठलवाडी परिसरात आज मंगळवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर व्यक्ती हा रेल्वे मध्ये कर्मचारी असल्याचे कळते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. संदीप उर्फ बद्री…