Browsing Tag

Lead Story

अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली तलाठी

विलास ताजने, वणी: आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे, हा बहुतांश मुलामुलींचा ध्यास असतो. हाच ध्यास मनाशी बाळगून तिने अभ्यास केला. अन् स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. समीक्षा हनुमान उपासे ही वणी तालुक्यातील परमडोह येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची…

‘पुष्पा’ स्टाईल तस्करी उघडकीस…. दुधाच्या गाडीतून तंबाखूची तस्करी

विवेक तोटेवार, वणी: पुष्पा सिनेमात रक्त चंदनाची तस्करी करण्यासाठी सिनेमातील हिरो पुष्पाराज हा वेगळ्या युक्ती लढवत होता. यात सर्वात प्रसिद्ध शक्कल होती दुधाच्या टँकरमधून रक्तचंदनाची तस्करी करणे. अशीच पुष्पा स्टाईल होणा-या तंबाखू तस्करीचा…

आणखी एका तरुणाची आत्महत्या.. तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मंदर येथे एका 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शनिवार सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. उमेश प्रकाश पेंदाने (25) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. उमेश हा काही दिवसांपूर्वी…

शासनाचे गायींकडे दुर्लक्ष… उपचारासाठी ना ऍम्बुलन्स, ना प्रतिदिन अनुदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अपंग, अंध, आजारी, निराधार, म्हाता-या गायींचा सांभाळ गोशाळा करतात. मात्र सध्या गोशाळेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या गोशाळा चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जात आहे. तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात गोशाळांना…

आज वणीत वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वंचित बहुजन आघाडीच्यावतीने १० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता स्थानिक खंडोबा वाघोबा देवस्थानात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज…

भरदिवसा वणीत 1.75 लाखांची धाडसी घरफोडी, चोरट्यांची ठाणेदारांना सलामी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील नांदेपेरा रोडवर असलेल्या सहारा पार्क येथे चोरट्यांनी धाडसी चोरी केली. गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.40 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घरफोडीत सोन्याचे दागिने व नगदी असा एकूण पावणे दोन लाख रुपयांचा…

दुचाकी लवकर परत न केल्याने लाकडी पाटीने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: कामानिमित्त दिलेली दुचाकी वेळेत परत न केल्याने एकाला लाकडी पाटीने बेदम मारहाण करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. इजासन फाट्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद मधूकर…

मारेगाव बसस्थानकाचा प्रश्न पोहोचला मानवाधिकार आयोगात

बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. शिवाय तालुक्याचे मुख्यालय आहे. मात्र या ठिकाणी अद्यापही बसस्थानक नाही. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार, आंदोलन झालीत. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. अलिकडेच या…

व्हॅलेन्टाईन विकमध्ये आनंद घ्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चा

बहुगुणी डेस्क, वणी: शाहीद कपूर आणि क्रिती सेनन अभिनीत 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा व्हॅलेन्टाईन विकच्या मुहुर्तावर प्रेक्षकाच्या भेटीला आला आहे. या सिनेमात रोबोट आणि मानवाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे.…

शेतीच्या कामासाठी वडील गेले शेतात, मात्र आढळला मुलाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: निवली शेत शिवारात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शुभम अरविंद खिरटकर (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो निवली (सुंदरनगर) येथील रहिवासी होता. तो…