Browsing Tag

Lead Story

आज तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 22 झाली आहे. सध्या रुग्णसंख्येच्या दरापेक्षा कोरोनावर मात करणा-यांचा दर अधिक…

कुंभा येथे विहिरीत उडी घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील एका 32 वर्षीय विवाहित तरुणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कुंभा येथे घडली. सदर घटना 9 जून च्या रात्री 8 वाजता दरम्यान घडली. प्रवीण सुनील कुमरे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणाचे…

वणीसह ग्रामीण भागातही आज दमदार पाऊस

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन दिवसापासून आकाशात काळे ढग दाटून येत होते. पण पाऊस होत नव्हता. शहरात आज गुरुवारी दिनांक 10 जून रोजी दुपारी 11 वाजेपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारी दोन नंतर पावसाने जोर पकडला व सुमारे एक तास शहरात दमदार…

वनोजा येथील रेतीसाठा वैध, महसूल विभागाची माहिती

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील वनोजा (देवी) शिवारात हिवरा गोरज मार्गावर आनंदराव जीवतोडे यांच्या शेतात खुल्या जागेवर साठवलेली अंदाजे 3 हजार ब्रास रेती वैध असल्याचा खुलासा महसूल विभागाने केला आहे. विशेष पोलीस पथकाने मंगळवार 8 जून रोजी…

वनोजा येथे 50 लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वनोजा (देवी) येथे अवैधरित्या साठवणूक केलेली तब्बल कार्यवाहीत सुमारे 400 ट्रक रेती (3 हजार ब्रास) रेती जप्त करण्यात आली. या रेतीची किंमत सुमारे 50 लाख रुपये इतकी होते. जिल्हा पोलीस…

मुकुटबन येथे फळ व भाजीपाला विक्रेत्यांना छत्री वाटप

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊन संपताच फळ व भाजीपाला विक्रेते रस्त्यावर रखरखत्या उन्हात आपले दुकान व हातगाडी लावून विक्री करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशा गरीब दुकानदारांना कडक उन्हापासून बचाव करिता मुकुटबन येथील गोदावरी अर्बन शाखेने…

आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण, दुसरी लाट ओसरतेय

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. दोन दिवसांच्या गॅपनंतर आत तालुक्यात रुग्ण आढळला. यातील एक रुग्ण हा शहरातील रंगारीपुरा येथील आहे तर दुसरा रुग्ण हा मारेगाव तालुक्यातील आहे. दरम्यान आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली.…

लालपरी सुरू झाली, मात्र प्रवासी फिरकेना

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यापासून बंद असलेली आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सोमवार 7 जुन पासून पुन्हा सुरू झाली. मात्र प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने एस टी महामंडळ…

वणी शहरात मालवाहू व जड वाहनामुळे वाहतूक विस्कळीत

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मध्यभागी असलेली बाजारपेठ आणि खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यातही जड व मालवाहू वाहने शहरातील प्रमुख रस्त्यावर उभे असल्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरातील रस्त्यावर सकाळी…