Browsing Tag

Lead Story

धक्कादायक: वणीतील बहुतांश दवाखान्यात आग प्रतिबंधक यंत्रणाच नाही

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजना तसेच अग्निविरोधी यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र वणी येथील बहुतांश दवाखान्यांमध्ये आगीपासून बचाव करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध…

मारेगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक

भास्कर राऊत, मारेगाव: आगामी पोळा व गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने मारेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 57 पोलीस पाटील हजर होते. ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात ही बैठक पार पडली. सण…

सण उत्सवात कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाई

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत मुकुटबनसह येणाऱ्या सर्व खेडे गावात पोळा सण शासकीय नियम पाळून शांततेत पार पाडावा असे आवाहन ठाणेदार अजित जाधव यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत सांगितले. त्या वेळी परिसरातील पोलीस पाटील व शांतता…

खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: घराजवळ खेळत असताना साचलेल्या खड्ड्यातील पाण्यात अचानक पडून एका दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शहरातील गोकुळनगर येथे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना उघडकीस आली. प्रमोद सुनील पोटे असे या चिमुकल्याचे नाव…

बैल ‘सजवा’ पण पोळा घरीच ‘गाजवा’

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण भागात वर्षातून एकदा येणारा बळीराजाचा उत्साहाचा आणि तितकाच आनंदाचा सण म्हणजे 'पोळा'. कोरोनाच्या महामारीच्या प्रादुर्भावमुळे मागीलवर्षी पोळा, मारबत व तान्हापोळा घरीच साजरा करण्यात आला. यंदा सार्वजनिकरित्या…

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: येथील मुख्य बाजार गांधी चौक येथे रस्त्याच्या मध्यभागी हातगाड्या उभी करून फळ भाजी विक्री केली जाते. त्यामुळे या भागात नेहमी वाहतुकीची कोंडी होत असतात. तसेच अपघात होण्याचा धोका देखील निर्माण होतो. अनेकदा कारवाई…

मांगलीतील अचानक अंधत्व आलेल्या तरुणाला आर्थिक मदत

सुशील ओझा, झरी: घरातील कर्ती व्यक्तीवर अचानक अंधत्व आल्यामुळे मांगलीतील टेकाम कुटुंबीय आर्थिक अडचणीत आले होते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत मांगली व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना पुढे सरसारवली व त्यांनी टेकाम कुटुंबीयांना 5 हजारांची आर्थिक…

नंदेश्वर देवस्थान येथे पार पडले रक्तदान शिबिर

जब्बार चीनी, वणी: दिनांक 1 सप्टेंबर रोजी वणीतील जगन्नाथ महाराज नंदेश्वर देवस्थानात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मराठा सेवा संघाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ व संभाजी…

ढाकोरी-बोरी मार्गावर रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन

तालुका प्रतिनिधी, वणी: चारगाव ते ढाकोरी बोरी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी पावसाच्या दिवसात पाणी साचलेल्या खड्डयांचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याकडे बांधकामविभागाचे दुर्लक्ष होत आहे. म्हणून सदर रस्त्याची…

घरफोडी करणा-या 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील डोर्ली येथील महादेव प्रकाश भोयर व मधूकर भोयर यांच्या घरी दिनांक 17 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरी झाली होती. एका घरफोडीत चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम असा सुमारे 13 हजार हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. तर…