Browsing Tag

Lead Story

चिंताजनक: शहरात अल्पवयीनांच्या गुन्ह्यात वाढ

जितेंद्र कोठारी, वणी:  शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी, ट्रॅक्टर व ऑटोची बॅटरी चोरी, घरफोडी, विनयभंग, चिडीमारीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अशा गुन्हांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.…

मनिष बतरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

जितेंद्र कोठारी, वणी: व्यापारी वर्गात प्रभाव असलेले राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मनिष बतरा यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. संजय देरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनिष बतरा यांनी शिवबंधन बांधून…

आजारपणाला कंटाळून वृध्दाने केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: मानसिक आजाराने कंटाळून एका वृद्ध व्यक्तींने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली. जनार्धन नामदेव ढवस (73) रा. कोना, ता. वणी असे आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव…

मारेगाव नगरपंचायत निकाल: काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष, मनसेची मुसंडी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून या निवडणुकीत सर्वाधिक 5 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर सेना व भाजप प्रत्येकी 4 जागा जिंकत दुस-या क्रमांकावर आहे. यावेळी मारेगावत मनसेचे इंजन…

रेतीची तस्करी करणारे दोन टॉक्टर ताब्यात

भास्कर राऊत, मारेगाव: रेतीची तस्करी करताना तालुक्यातील दापोरा शेत शिवारात दोन ट्रॅक्टर पकडून कार्यवाही करण्यात आली. हे दोन्ही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. तालुक्यामध्ये रेतीची अवैधरित्या तस्करी राजरोसपणे सुरू आहे. यात कधी…

मारेगावातील 3 प्रभागासाठी विक्रमी मतदान, आज लागणार निकाल

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या 17 जागांपैकी उर्वरित 3 वार्डासाठी मंगळवारी दिनांक 18 जानेवारी रोजी शांततेत मतदान पार पडले. या तीन जागांच्या मतदानासाठी नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. या जागांसाठी एकूण 82.74 टक्के मतदान…

परमेश्वरी जगमोहनजी पोद्दार यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जैताई मंदीर जवळील रहीवासी असलेल्या परमेश्वरी जगमोहनजी पोद्दार यांचे आज दिनांक 19 जानेवारी बुधवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी…

साधेपणाने संजय देरकर यांचा वाढदिवस साजरा

जितेंद्र कोठारी, वणी: शिवसेना नेते व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांचा कोणताही मोठा गाजावाजा न करता साधेपणात वाढदिवस साजरा कऱण्यात आला. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. संजय देरकर यांना शुभेच्छा देण्यासाठी…

संत रविदास सभागृहात सावित्रीबाई फुले व जिजाऊंना अभिवादन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 15 जानेवारी रोजी वणीतील संत रविदास महाराज महाराज सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. चर्मकार युवा मंच वणीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…