Browsing Tag

Lead Story

वाहतूक विभागाकडून 33 लाख 62 हजारांचा दंड वसूल

जितेंद्र कोठारी, वणी: अपघातांमध्ये घट येण्यासाठी तसेच वाहतूकीमध्ये शिस्त येण्यासाठी चालकांनी मोटार वाहन कायद्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. तरीही वारंवार वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. या कायद्याची परिणामकारकता साधण्यासाठी नियम…

देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: सीबीएसई शिक्षणामध्ये सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थापैकी एक असलेली पोदार इंटरनॅशनल संस्थेचा उपक्रम आता आपल्या वणी शहरात सुरू झाला आहे. शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर घुग्गुस रोड वरील मंदर जवळ मार्कंडेय पोदार लर्न स्कूल…

घरगुती नळ कनेक्शनचा अहवाल दाखवून व्यावसायिकाला कनेक्शन

जितेंद्र कोठारी, वणी: नळ कनेक्शनचा खोटा अहवाल देऊन नगरपालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडवले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक पी के टोंगे यांनी केला आहे. घरगुती व व्यावसायिक वापरासाठी नळ कनेक्शनचे वेगवेगळे दर आहे. मात्र व्यावसायिक वापरासाठी…

अखेर वणी व परिसरात पावसाची वादळीवा-यासह दमदार हजेरी

जितेंद्र कोठारी, वणी: वळीवाचा पाऊस न झाल्याने शिवाय मृग नक्षत्र लागूनही पाऊस न झाल्याने तापमानात कोणतीही घट होताना दिसत नव्हती. मात्र शुक्रवारी संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह तब्बल दोन तास पावसाने जोरदार बॅटिंग…

वणीत दैनिक अभिकर्ता असोसिएशनचे गठन

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही वर्षांत शहरात पतसंस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या पतसंस्थेच्या दैनिक बचत अभिकर्त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अभिकर्ते पतसंस्थेच्या हिताकरिता कर्तव्य बजावतात. मात्र पतसंस्था कडून…

खळबळजनक : मोहदा (वेळाबाई) चे उपसरपंच व ग्रा.प.सदस्य अपात्र घोषित

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील महत्वाच्या मोहदा (वेळाबाई) ग्रामपंचायतीचे उपसरपंच व एका ग्रामपंचायत सदस्याला अपात्र घोषित करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.…

नुपूर शर्माला तात्काळ अटक करण्याची मुस्लिम समाजाची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्मा हिला अटक करुन फाशी देण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. नुपूर शर्मा हिने मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज वणी शहरात शहर ए मदिना सोशल फाउंडेशन…

मारेगाव तालुक्यात कु. कांचन आवारी प्रथम तर कु. सोनल ठाकरे द्वितीय

भास्कर राऊत, मारेगाव: 12 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. तालुक्याचा निकाल ९२.४१ टक्के लागला आहे. संकेत ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु कांचन संतोष आवारी ही ९० टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली आहे. तर याच कॉलेजची सोनल हरिश्चंद्र ठाकरे ही…

छ. शिवाजी महाराज अंधश्रध्दा निर्मूलन करणारे थोर समाजसुधारक: प्रा. डॉ. संतोष बनसोड

विवेक तोटेवार, वणी: शिवाजी महाराजाच्या ताब्यात 280 किल्ले होते, त्यापैकी 111 किल्ले त्यांनी स्वतः निर्माण केले. त्यांच्या किल्ल्यातील किल्लेदार बहुतांश मराठा असत, परंतु 63 किल्ल्यांवरील किल्लेदार हे मागासवर्गीय होते. आजपर्यंत…

चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: जुरासिक वर्ल्ड ही सिरीज आवडणा-या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी दिनांक 10 जून रोजी वणीतील सुजाता थिएटरमध्ये 'जुरासिक वर्ल्ड: डोमिनियन' हा सिनेमा रिलिज होत आहे. 'जुरासिक वर्ल्ड: डोमिनियन' या सिनेमा आपल्याला…