Browsing Tag

Lead Story

महिलेच्या गळ्यातून भरदिवसा सोन्याची पोत हिसकविली

जितेंद्र कोठारी, वणी: पोळ्याची खरेदी करण्यासाठी वणीत पतीसोबत आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या तरुणाने धूम स्टाईल लंपास केले. देशमुखवाडी भागात शुक्रवारी सायंकाळी 5.20 वाजता ही घटना घडली. याबाबत रंजना दिनेश…

मारेगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, मार्डी येथील शेतातील इंजिनची चोरी

भास्कर राऊत, मारेगाव: शेतासाठी वापरण्यात येणारे डिझेल इंजिन चोरट्याने चोरून नेले. ही घटना मार्डी जवळील तुकापूर शिवारात शुक्रवारी रात्री घडली. या घटनेने तालुक्यातील ओलिताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांममध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मारेगाव…

धोपटाळा येथील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यातील धोपटाळा येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सदानंद विठ्ठल दोरखंडे (वय अंदाजे 20) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो शेती करायचा.…

वेगाव येथील तरुणाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अविनाश जीवन मेश्राम वय 28 असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. दोन दिवसांआधी त्याने कीटकनाशक प्राशन केले होते.…

रविवारी शेतकरी मंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव

जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी वणीतील शेतकरी मंदिर येथे शहरातील 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आ. संजीवरेड्डी…

चक्क पत्रकार पतीनेच दिली शिक्षक पत्नीला जीवे मारण्याची सुपारी

जितेंद्र कोठारी, वणी: शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी बेलोरा फाट्यावरून चंद्रपूर येथे घरी परत जाताना एका शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ला झाल्याच्या काही वेळातच घटनास्थळावरील काही लोकांनी पाठलाग…

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 6 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील यवतमाळ रोडवरील एच.पी. पेट्रोल पम्पजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळताना 6 जणांना वणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून 13 हजार रुपये रोख व गंजीपत्ता जप्त केले आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपीची…

आपल्या भागात वारंवार पूर का येतो?

आपल्या भागात वारंवार पूर का येतो? - शुभम पिंपळकर गेल्या अनेक अनेक दिवसांपासून आपल्या विभागामध्ये वारंवार पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. परंतु ही पूर परिस्थिती वारंवार का निर्माण होत आहेत आणि ते…

मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा जल्लोषात साजरा

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव वणीतील अमृत भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता महाआरती करून श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा झाला. आज दुपारी 12 वाजता अमृत भवन येथे दहीहांडी तसेच काला व महाप्रसादाचा…

लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: लाल सिंग चढ्ढा आणि रक्षाबंधन या मोठ्या स्टार कास्ट असलेल्या व बिग बजेट सिनेमाला झोपवणारा थ्रिल आणि मिस्ट्रीने भरपूर असलेला कार्तिकेय 2 हा सिनेमा वणीत रिलिज होतोय. शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट पासून वणीतील सुजाता थिएटरच्या…