महिलेचा विनयभंग करून प्राणघातक हल्ला

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोरंबी मारेगाव येथे एका महिलेवर विनयभंग करून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. पीडित महिला ही मजुरीचं काम करते. आज…

काँग्रेस सेवादलाच्या पदयात्रेचा शिंदोला येथे समारोप 

विलास ताजने, मेंढोली: शासनाने काही निवडक तालुके दुष्काळग्रस्त किंवा दुष्काळ सदृश घोषित केले. मात्र वणी उपविभागात सर्वत्र खरिप हंगामाची परिस्थिती गंभीर असतांना वणी आणि झरी तालुक्यांना वगळण्यात आले. म्हणून दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, शेतकरी,…

सुकणेगाव येथे भवानी मातेच्या मंदिराच्या पाय-यांचे लोकार्पण

निकेश जिलठे, वणी: सुकणेगाव येथे भवानी मातेच्या मंदिराच्या पाय-याचा लोकार्पण सोहळा शनिवारी दिनांक 17 नोव्हेंबरला पार पडला. या पाय-या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांच्या पुढाकाराने व लोकवर्गणी आणि श्रमदानातून करण्यात आल्या.…

मार्डी येथे बिरसा मुंडा जयंती साजरी, विविध कार्यक्रमांचे आयोजन

निकेश जिलठे, वणी: आदिवासींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचा मार्डी येथे सत्कार करण्यात आला. जय पेरसापेन आदिवासी संघटना व जय पेरसापेन बहुउद्देशीय…

शिंदोला येथील लक्ष्मण झाडे यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली:  वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेतकरी लक्ष्मण रामाजी झाडे यांचे दि.(१७) शनिवार दुपारी सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी चंद्रपूर…

आरोग्य अधिकारी मस्त, अन् नागरिक त्रस्त

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कोलगाव (साखरा) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. म्हणून सदर वैद्यकीय अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी तालुका…

स्वच्छता अभियानाचा गल्लोगल्ली झंझावात…

निकेश जिलठे, वणीः स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून वणीकरांच्या सेवेत 14 APE घंटा गाड्यांचे (छोटा हत्ती) लोकापर्ण नामदार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्ड, दिनकर पावडे, विजय पिदुरकर…

…अन चिमुकलें लेकरं पाणावलेल्या डोळ्यांनी बघतात आईची वाट

विलास ताजने, मेंढोली: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कढोली (खु.) येथील विवाहित महिला एक महिन्यापासून बेपत्ता आहे. कुटूंबीय शोध घेत आहे. परंतु अजून काही सुगावा लागला नाही. परिणामी कुटुंबातील लोकांची चिंता वाढली आहे. आज नाही तर…

प्रवीण खानझोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

निकेश जिलठे, वणी: जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसात माणूस बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले शाहु आंबेडकरी विचारांची कास धरून आज सामाजिक आणि…

सुप्रसिद्ध कव्वाल मनोहरदीप ‘रुसवा’ भगत यांचे निधन

निकेश जिलठे, वणी: 'भीमवाडी' या भीम आणि बुद्धगीतांच्या अल्बमने अख्या महाराष्ट्राला वेड लावणारे सुप्रसिद्ध कव्वाल मनोहरदीप 'रुसवा' भगत यांचे शुक्रवारी दुपारी 1 वाजता वरोरा येथे त्यांच्या राहत्या घरी आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.…