अडेगाव येथे रेशन दुकानात जादा दराने विक्रीचा आरोप

सुशील ओझा, झरी: लॉकडाउनमध्ये अडेगाव येथील रेशन दुकानात शासकीय नियमांचे उल्लंघन करून धान्याची विक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ४८ रुपयात मिळणारे धान्य ७० रुपये तर ९० रुपयांच्या धान्यासाठी कार्डधारकांकडून १२० रुपये घेतले जात…

निजामुद्दीनला गेलेल्या ‘त्या’ तिघांचा रिपोर्ट निगेटीव्ह, मात्र….

जब्बार चीनी, वणी: यवतमाळ येथे आयसोलेशन वार्डमध्ये रिपोर्टची वाट पाहत असलेल्या वणीतील निजामुद्दीन येथे गेलेल्या तिघांचे तसेच वणीतील आणखी एक व्यक्ती अशा चौघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र काल आयसोलेशन वार्डातील 8 जणांना कोरोनाचा…

संचारबंदीचे नियम तोडणा-यांना न्यायालयाचा दणका

सुनील पाटील, वणी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने संपुर्ण राज्यात संचारबंदी घोषीत केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. पंरतु सोशल डिस्टंसींग व संचारबंदीचे नियम धाब्यावर ठेवून वावरणा-या 20…

मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड

सुशील ओझा, वणी: पाटण पोलिसांनी मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड टाकत 10 हजार 700 रुपयांची मोहाची दारू जप्त केली. तसेच या कारवाईत 5 हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले. तर मांडवी येथील…

चौपाटी बार फोडणा-यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चौपाटी (मंजुषा) बार फोडणा-या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. घटना उघडकीस आल्याच्या केवळ 24 तासांच्या आतच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या घटनेत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून…

विवाह सोहळ्यांच्या मंगल सनईत ‘कोरोना’चा बेसूर

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूमुळे लग्न सोहळ्याचे मंगलमय सूर बेसूर झाले असून, मंगल कार्यालय व लॉन्सचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगल कार्यालय व्यवसायाशी निगडित असणा-या घटकांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाचे वादळ जगभर पसरले…

शब-ए -बरात घरीच साजरी करण्याचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: आज गुरुवारी साजरी होणारी शब-ए-बरातची रात्र मुस्लिम बांधवांनी आपल्या घरी कुटुंबातच साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन वणी शहरातील सर्व मस्जीद कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या देशभरात संचारबंदी असून गल्ली, मोहल्या,…

यवतमाळ जिल्ह्यातील 8 रुग्णांना कोरोनाची लागण

जब्बार चीनी, वणी: आज यवतमाळ येथे 8 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जे नवीन रिपोर्ट आले ते सर्व तबलिगीशी संबिधीत असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह…

मुंगोली, माथोली, जुगाद, साखरा, कोलगाव येथे गरजूंना मदत

बहुगुणी डेस्क, वणी: मुंगोली, माथोली, जुगाद, साखरा व कोलगाव येथे न्यू चॅरिटीबल ट्रस्ट, आयटक युनियनच्या माध्यमातून व  सरपंच यांच्या सहभागातून धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. सुमारे शंभर गरजूंना कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल एवढी धान्याची किट…

राजूर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बहुगुणी डेस्क, वणी: मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी तर्फे आज राजूर येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. राजूर येथील 100 गरजू कुटुंबांना तांदूळ, डाळ, तेल, तिखट, हळद, साबण यांचे वितरण करण्यात आले. मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस.ई.…