नवरगाव धरणात 100 टक्के जलसाठा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत वरदायीनी ठरलेला नवरगाव मध्यम प्रकल्प धरण रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे 100 टक्के भरले असून आता धरणाच्या रेस्टर वरून पाणी वाहायला सुरवात झाली आहे. त्यामुळे निर्गुडा नदीच्या…

पांढरकवडा येथे कोरोनाची द्विशतकाकडे वाटचाल….

अयाज शेख, पांढरकवडा: पांढरकवडा शहरात कोरोनाचे आपला विळखा चांगलाच घट्ट केला असून आज शहरात 23 कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले. यात 13 महिला व 9 पुरुष आहेत. शहरात सध्या कोरोना बधितांची संख्या 197 झाली आहे. आज दु:खद घटना म्हणजे महादेव नगर येथील…

पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी अजय संजय कंडेवार

जब्बार चीनी, वणी: राजूर कॉलरी येथील पत्रकार अजय संजय कंडेवार यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टी NSP (U) संलग्न माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांची यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या अहमदनगर येथे…

शरद पवारांना पाठवले 1 हजार पोस्टकार्ड

विवेक तोटेवार, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या टिप्पणीचे वणीतही शनिवारी पदसाद उमटले होते. श्रीराम नवमी उत्सव समिती, वणी तर्फे रस्त्यावर उतरून निषेध करण्यात आला होता. दरम्यान शरद पवार यांना “जय…

मारेगावात पावसाचा कहर, अनेक घरांमध्ये शिरले पाणी

नागेश रायपुरे, मारेगाव: रविवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मारेगावात मुसळधार पाऊस आला. या पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले. यात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मारेगाव शहरातील अनेक प्रभागातील नाल्याची सफाई गेल्या अनेक महिन्या…

कंपनीत जात असाल तर घरी येऊ नका

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत उत्तरप्रदेश येथील तीन कामगार कोरोना पोजिटिव्ह निघाल्याने मुकुटबन सह परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. २५ जुलै रोजी उत्तरप्रदेश येथून २७ कामगार खाजगी ट्रॅव्हल्स ने मुकुटबन…

मार्डी येथे 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मार्डी येथील एका तरुणाने 22 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारी 3 वाजता उघडकीस आली. शुभम बंडू भासपाले (22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात…

दवाखान्यातून बेकायदेशीररित्या औषधींची विक्री ?

विवेक तोटेवार, वणी: शहरातील वरोरा रोडवरील एका दवाखान्यातून औषधांची विक्री होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सदर डॉक्टरांना औषध व सौंदर्य प्रसाधन कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. औषधी विक्री करण्याचा अधिकार केवळ…

हंसराज अहिर व आ. बोदकुरवार यांची RCCPL कंपनीला भेट

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीत मुकुटबन व परिसरातील तसेच बाहेर राज्यातील सुमारे १७०० ते १८०० कामगार काम करतात. या कंपनीत कोरोनाचे 3 रुग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा…

घोन्सा येथे कोरोनाचा शिरकाव, मयतीत गेलेली महिला पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: प्रशासन वारंवार दिलेले नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र बेजबाबदारी व त्याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाचा थेट घोन्सा येथे शिरकाव झाला आहे. तेली फैलातील एक महिला चिखलगाव येथे मयतीत गेली होती. ती पॉजिटिव्ह आली होती.…