वेडद येथे एकाच दिवशी कोरोनाचे 10 रुग्ण आढळलेत

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यासह पांढरकवडा, वणी, दारव्हा येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. आता झरी तालुक्यालासुद्धा कोरोनाची लागण सुरू झाली आहे. तालुक्यातील वेडद येथे एकाच दिवशी कोरोनाचे १० रुग्ण आढळल्याने गावात चांगलीच दहशत…

उकणीतील तरुणाची जंगलात आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: उकणी येथील आकाश दिवाकर दरवेकर (27) याने सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास मोहुर्ली येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश हा उकणी येथील वाल्वो कंपनीत क्लिनर म्हणून काम करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या…

ताडपत्री विना कोळशाची ट्रकमधून वाहतूक

अमोल पानघाटे, साखरा (को): लगतच्या परिसरात मुंगोली, निर्गुडा, पैनगंगा आणि कोलगाव आदी कोळशाच्या खुल्या खाणी आहेत. सदर खाणी मधून काढलेला कोळसा रेल्वे साईडिंगपर्यंत ट्रकद्वारे वाहून नेला जातो. परंतु ताडपत्री न झाकता कोळशाची वाहतूक केल्या जाते.…

मेंढोली येथील शेतगड्याला झाला सर्पदंश

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील एका शेतगड्याला सर्पदंश झाल्याची घटना दि. 7 सोमवारी दुपारी घडली. बाबाराव बापूराव कुटारकार (57) असे सर्पदंश झालेल्या शेतगड्याचे नाव आहे. वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी जनार्दन बालाजी…

पंचशील नगर, रांगणा, देशमुखवाडी, नांदेपेरा रोड येथे कोरोनाचा शिरकाव

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. आज तब्बल 18 रुग्ण आढळून आलेत. यात आरटीपीसीआर स्वॅब नुसार 15 तर ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आले आहेत. आज पंचशील नगर, रांगणा, देशमुखवाडी, नांदेपेरा रोड येथे कोरोनाने…

उन्हाळी 2020 परीक्षा संचालन कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांना सूचना

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: कोविड -19 चा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उन्हाळी 2020ची परीक्षा होऊ शकली नाही. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांतर्गत…

सावर्ला येथे विष पिऊन तर गणेशपूर येथे गळफास लावून आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: सततच्या आत्महत्येने सध्या तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री गणेशपूर येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर सावर्ला येथे रविवार संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एका इसमाने विषारी औषध प्राषन करून आपली…

स्माईल फाउंडेशनने केले सरकारी हॉस्पिटलमध्ये वृक्षारोपण

विवेक तोटेवार, वणी: स्माईल फाउंडेशनने सरकारी हॉस्पिटल परिसरात वृक्षारोपण केले. त्यात कडुलिंब, गुलमोहर आणि पिंपळाचा समावेश होता. यावेळी सरकारी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. सुलभेवार, स्माईल फाऊंडेशनचे संस्थापक सागर जाधव, विनम्र कुईटे, आकाश लेडांगे,…

गणेशोत्सवाचा खर्च टाळून गतिमंद मुलाच्या शस्त्रक्रियेकरिता आर्थिक मदत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ब्राम्हणी फाटा येथील शिव गणेशोत्सव मंडळाने यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून मागील जमा शिल्लक खर्च न करता, एका गतिमंद मुलाच्या शस्त्रकियेकरिता 34 हजाराची आर्थिक मदत केली. मंडळाचे अध्यक्ष रवी बोढेकर यांच्या…

अहेरअल्ली जिल्हा परिषद शाळेत ऑनलाईन शिक्षकदिन साजरा

सुशील ओझा, झरी: अहेरअल्ली येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेने ऑनलाईन शिक्षकदिन साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भोयर होते . प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे,…