बुरांडा(खडकी) येथे शेतकऱ्याचा मृत्यू 

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील एका शेतकऱ्याचा घरी अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील राजेंद्र कवडू नांदे (३४) हा वडिलोपार्जित तीन एकर शेती करित होता.…

स्वागतद्वारामुळे चांगल्या रस्त्यांना पडत आहे खड्डे

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात आता स्वागत द्वार उभारणे नित्याचेच होऊन बसले आहे. कोणत्याही धर्माचा उत्सव असो किंवा एखादा कार्यक्रम त्यासाठी रस्त्यामध्ये स्वागतद्वार उभारले जाते. स्वागरद्वार उभारताना रस्त्याला फोडून त्या ठिकाणी लाकडी फाटे…

चिंतामणी ट्रॅव्हल्सला अपघात

रवि ढुमणे वणी(यवतमाळ): चिंतामणी ट्रॅव्हल्सला अहमदनगर जवळ पहाटे पाच वाजताचे सुमारास अपघात झाल्याची माहिती आहे.  अपघातात  मंडळ अधिकारी खिरेकर जखमी झाले आहेत तर मारेगाव तहसील कार्यालयात असलेले भगत पण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी…

ग्रामीण भागातील दारुबंदीचा निर्णय महिलांसाठी डोकेदुखी

रफीक कनोजे, झरी: मागील दोन महिन्यांपासुन शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत कायर  बिटमधील पुरड, गोडगाव (ईजासन) व कायर ह्या गावात अवैध देशी दारूची खुल्लेआम विक्री सुरु आहे. पण स्थानीय पोलीसांची मुक सहमती असल्यामुळे यवतमाळ एलसीबी व वणी डीबी पथक सुद्धा…

कापूस वेकण्यासाठी मजूर भेटत नसल्याने शेतकरी अडचणीत 

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण हा कापूस उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी आता कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. सुरवातीला या पांढऱ्या सोन्याला 3800 रुपये भाव होता व कापूस वेचणीची…

मांगलीत आडव्या बाटली साठी सहा जानेवारीला मतदान

रफीक कनोजे, झरी : तालुक्यातील मांगली गावातील परवाना धारक देशी दुकान बंद करण्याकरिता सर्व महिला एकवटल्या असून १५ ऑगस्टला गावातील संपूर्ण दारू बंद करण्याचा निर्णय घेऊन तसा ठराव सुद्धा घेण्यात आला होता. त्यानंतर गावात विशेष ग्रामसभा घेण्यात…

वणी पोलिसांनी केली स्वच्छता मोहिमेला सुरुवात

वणी (रवि ढुमणे): वणी शहरात पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी सकाळी साडेसात वाजता स्वच्छता  मोहीम राबविण्यात आली होती. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. जिकडे तिकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.  वणी शहरात स्वच्छता…

टिप्पर पलटी  झाल्याने एक जागीच ठार, दोन जखमी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कुंभा येथुन येणा-या नरसाळा गीट्टी खदानला जाणारा टिप्पर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाले आहेत. कुंभा येथे गीट्टी मटेरीयल टाकुण नरसाळा कडे परत जात असतांना लोकेश लाईम कंपनीचे टिप्पर क्रमांक…

अन… त्याने केले अनाथ पोरीला जीवनसाथी..!

वणी(रवि ढुमणे): सध्या उपवर मुलामुलींचे लग्न जमविणे सोबतच जमलेले लग्न उरकण्याचा सपाटा सुरू आहे.  यातच समाजाच्या रूढी परंपरेला तडा देत एका तरुणाने अनाथ असलेल्या मुलीसोबत लग्न करून  जीवनाचा आधार दिला आहे. लग्न जमवायचं म्हटलं की, मुलाकडे…

विकास निधी उपलब्ध, पण मंजुरीच्या चक्रव्यहात

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतला सव्वादोन वर्ष उलटले. सत्ताधारी भाजपा आणि एका अपक्षाच्या मदतीने सत्तेचा गाडा चालवत असताना मारेगाव शहर विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुरूवातीला घनकचर्याचे कंत्राट बोगस कंत्राटदाराला दिल्याने…