गर्भवती वाघिणीच्या शिकार प्रकरणी आणखी 5 आरोपींना अटक

सुशील ओझा, झरी: मांगुर्ला जंगल परिसरातील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी प्रकरणी आज दिनांक 19 जून रोजी पहाटे 2.30 वाजताच्या सुमारास 5 आरोपींना अटक करण्यात आली. नागोराव भास्कर टेकाम, सोनु भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनु तुकाराम टेकाम,…

झरी तालुक्यात ‘माझे लसीकरण…’ अभियानाचा शुभारंभ

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात 'माझे लसीकरण, माझे संरक्षण...' या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानांतर्ग झरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर हे स्वतः आपले कर्मचारी घेऊन गावागावात जाऊन तरुण युवकपासून तर वृद्धांपर्यंत तर…

गरजू महिला शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ महाराष्ट्र शासन अंगीकृत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालीत साधन केंद्र मारेगाव, GIZ प्रकल्पा अंतर्गत मारेगाव तालुक्यातील गरजुवंत शेतकरी महिलांना मोफत बि- बियाणे व खतांचे वाटप…

पावसाळा आला… चला झाडे लावुया, पर्यावरण वाचवुया

विवेक पिदूरकर: पावसाळा आला की जसे शेतीच्या कामाची लगबग वाढते. तशीच लगबग पर्यावरण प्रेमी आणि फुलझाडांची आवड असणा-यांची असते. झाड आणि वृक्षप्रेमींसाठी वणी शहरापासून अगदी जवळच असलेल्या गौराळा येथील चापली पवनसूत नर्सरी येथे विविध प्रकारची झाडे…

वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

विवेक पिदूरकर: वणी शहरातील रविनगर येथील अग्रसेन भवन समोरील प्राईम लोकेशनवरील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे. 2100 स्वेअर फुट अशा प्रशस्त जागेत हा बंगला/घर असून यात 1700 स्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय घराच्या आवारात पार्किंगसाठी…

इलेक्ट्रिकच्या वायरने तरुणाने घेतला गळफास

नागेश रायपुरे, मारेगाव: एका अविवाहित तरुणाने स्वतःच्या घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना मारेगाव शहरातील प्रभाग क्र 4 मध्ये घडली. आज रात्री 9 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. प्रवीण पुरुषोत्तम परसुटकर (30) असे आत्महत्या करणाऱ्या…

पॉकेटमनीतून ‘प्रयास’ने राबवले विविध सामाजिक उपक्रम

जब्बार चीनी, वणी: शहरातील प्रयास या सोशल गृपद्वारा लॉकडाऊन काळात विविध सामाजिक कार्य करण्यात आले. यात गरजुंना धान्य वाटप, रुग्णाला आर्थिक मदत, वृक्षारोपण इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या गृपमधले बहुतांश सदस्य हे विद्यार्थी…

चारगाव चौकीजवळ दुचाकीसमोर बैल आडवा आल्याने भीषण अपघात

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणीवरून गावी परत जाताना रस्त्यात दुचाकीसमोर बैल आडवा आल्याने दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. या अपघातात मेंढोली येथील शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. चारगाव चौकीजवळील पेट्रोल पम्पजवळ आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना…

मुकुटबन येथील 2400 कोटीचा सिमेंट प्रकल्प बंद करू नये

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील बहुप्रतिक्षित सिमेंट प्रकल्पाच्या भवितव्यावर अंधाराचे सावट पसरले आहे. निर्माणाधिन सिमेंट प्रकल्प क्षेत्र टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य-ताडोबा-अंधारी आणि कावळ व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र कॉरीडोरमध्ये येत…

वणीत माकप व किसान सभेचे निदर्शने आंदोलन

जब्बार चीनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आलं. वाढती महागाई व शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे…