सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर कारवाई: 28 हजारांचा तंबाखू जप्त

विवेक तोटेवार, वणी: दीपक चौपाटी जवळ एका सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करत 28 हजारांचा सुगंधीत तंबाखू जप्त केला. मात्र आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. 18 मे रोजी ही कारवाई करण्यात आली. दीपक चौपाटी येथे राधे राधे…

पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचा इशारा

जितेंद्र कोठारी, वणी : विदर्भात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. पुढचे तीन दिवस विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 22 ते 24 मे दरम्यान वादळीवारा व विजांच्या कडकडाटासह मध्यम व…

वणीत दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबेना, पुन्हा दुचाकीची चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: वणीत दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबत नाहीये. सोमवारी वणीतील लालगुडा येथून एक दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण नथ्थूजी गोवारदिपे (32) हे लालगुडा येथील रहिवासी…

गांजा ओढताना तीन तरुणांना अटक, वणी पोलिसांचे गर्दुल्यांवर धाडसत्र

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील निर्जन ठिकाणी गांजा ओढणा-यांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 3 तरुणांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात तरुण व शाळकरी मुलं गांजाच्या आहारी गेले…

दरोडा टाकण्याचा डाव पोलिसांनी उधळला, जंगली पीर जवळ मध्यरात्री थरार

जितेंद्र कोठारी, वणी: जंगली पीर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना वणी पोलिसांनी शिताफीने चार जणांना अटक केली तर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. संतोष उर्फ डोमा दिलीप मेश्राम (33), शेख शाहरुख शेख सलीम (22), शेख इरफान शेख सलीम (24),…

धक्कादायक ! वणीत ‘या’ ठिकाणी तब्बल 10 महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद

विवेक तोटेवार, वणी: शहरातील झिलपीलवार ले आऊट व स्नेहनगर येथील पाणीपुरवठा तब्बल 10 महिन्यापासून बंद आहे. या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार प्रशासनाला निवेदन दिले. मात्र त्यांच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच नगर…

स्थानिकांचा प्रखर विरोध डावलून पार पडले जनसुनावणीचे सोपस्कार

जितेंद्र कोठारी , वणी : ताडोबा-कावळ व्याघ्र प्रकल्प आणि टिपेश्वर अभयारण्य दरम्यान वन्यजीव कॉरिडॉर मधील मार्की-मांगली कोल ब्लॉक II साठी सोमवारी पर्यावरण विषयक जनसुनावणी पार पडली. जनसुनावणी दरम्यान स्थानिक शेतकरी, वन्यजीव कार्यकर्ते आणि…

दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक ठार

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा वाहतूक करणारे दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात घडला. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात समोरासमोर झालेल्या या अपघातात एका ट्रकचा चालक ठार झाला, तर दुसऱ्या ट्रकचा चालक जखमी झाला. शनिवार 13 मे रोजी…

शहरात सुरू असलेले मटका अड्डे तात्काळ बंद करा, मुख्यमंत्र्यांना साकडे

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली मटका पट्टी तात्काळ बंद करावी अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे करत याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी…

जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जैन ले आउट स्थित गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्ष 2023 ते 24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. गुरुपीठ येथे नर्सरी, केजी 1, केजी 2 सह वर्ग 1 ते वर्ग 7 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. माफक दरात…