शहाबुद्दीन अजानी यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान प्राप्त

"टॉप ऑफ द टेबल क्लब मेंबर अमेरिका" सन्मानाने गौरव

7

जब्बार चीनी, वणी: शहरातील सुपरिचित विमा अभिकर्ता शहाबुद्दीन अजानी यांना “टॉप ऑफ द टेबल क्लब मेंबर अमेरिका” हा विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेला आहे. महत्त्वाचे म्हणजे ते अमरावती विभागाच्या 33 वर्षाच्या इतिहासामध्ये हा सन्मान प्राप्त करणारे प्रथम व एकमात्र विमा अभिकर्ता आहे .

“टॉप ऑफ द टेबल क्लब मेंबर” हा विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मान असून जगातील सर्व विमा कंपनीचा समावेश असलेल्या मिलियन डॉलर राऊंड टेबल -MDRT या अमेरिकेच्या संघटने तर्फे “विशिष्ट अतिउच्च श्रेणीतील सर्वोच्च कार्य ” करणाऱ्या विमा प्रतिनिधींना हा सन्मान प्रदान करण्यात येतो. या सोबतच त्यांनी 18 वेळा MDRT मेंबरशीप प्राप्त केली आहे. विमा क्षेत्रातील विविध स्तरावरील सर्वोच्च बहुमान कार्पोरेट क्लब मेंबर, गॅलेक्सी क्लब मेंबर, झोनल लेवल सुपर स्टार एजंट, लाईफ टाईम MDRT Member असे सर्वच सन्मानही शहाबुद्दीन अजानी यांना मिळाले आहे.

मागील दोन वर्षापासून बाजारपेठेत मंदीचे वातावरण, कोविड- 19 व लॉक डाऊन सारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अजानी यांनी वर्ष 2021 मध्ये अल्प कालावधीत हे यश संपादन केलेले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कार्यामुळे विविध स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या या विक्रमी यशाकरिता एलआयसी वणी शाखेचे शाखाधिकारी प्रकाश झलके, विकास अधिकारी बि. बि. विटाळकर यांनी व शाखेच्या इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केलेले आहे.

हे देखील वाचा:

धक्कादायक: वाघाने पाडला 3 गायींचा फडशा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.